Skip to main content

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (४)

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 15/02/2014 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्या पोपटाने जोरदार गर्दी खेचली होती. पोपट लहान अस्ला तरी तो भल्या मोठ्या खुर्चीवर बसला होता, खुर्चीशेजारी त्या पोपटाच्या जन्मदात्याचे वडील उभे होते. त्यांचे नाव नरेशभाई. गोरापान वर्ण, निळसर घारे सोळे आणि अथांग शुभ्र दाढी असलेले हे व्यक्तिमत्त्व मला भावले.

क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 14/02/2014 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य क्रिस्पी सेसमी प्राँससाठी: १०-१५ कोळंबी साफ करु घेणे पाऊण वाटी मैदा (ह्यातील थोडा बाजूला काढून ठेवा कोटींगसाठी) पाऊण वाटी भाजलेले पांढरे तीळ शेजवान सॉस / चटणी (चिंग्सची शेजवान चटणी भारतात सहज मिळते, मस्तचं लागते) मीठ तेल .

आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग २ ... आल्याच्या वड्या.......

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 14/02/2014 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमतः काही गोष्टी: १. ह्या अत्यंत घाई घाईत बनवल्याने हव्या तशा जमल्या नाहीत आणि मध्येच ऐन वेळी फोन आल्याने थोडी भानगड झाली. २. श्री. आदूबाळ आणि जेपी ह्यांच्या आग्रहास्तव बनवल्या असल्याने, ही पा.क्रु. त्यांना अर्पण. ३. वड्या करायला शिकायचे असेल तर ही प्रथम शिकायला लागते.समजा चुकल्याच (जशा माझ्या चुकल्या) तर चहात वापरता येतात आणि उरलेल्या किसाचा (किंवा चोथ्याचा) उपयोग लोणच्यासाठी किंवा मुखशुद्धी बनवण्यासाठी करता येतो. ४. मोबाईल बंद ठेवा किंवा फोन घेण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करा. ५.

A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 14/02/2014 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे. बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे. माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोब

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 ४) आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.

टोफु बिर्यानि

लेखक आरोही यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :२ वाट्या बास्मति तान्दुळ. खडा मसाला,बिर्यानि मसाला, मटार्,टोफु, तळलेकान्दा,काजु,मनुके,चिरलेला कान्दा ,चि. टोम्याटो दहि १ वाटिं, तेल.पानि,मिठ,थोडे दुध आनि केशर,कोर्न फ्लोर अर्धा चमचा.biryani क्रुति: प्रथम सर्व खडा मसाला,मिठ आवडिनुसार घालुन बास्मति भात तयार करावा. मग एका भान्ड्यात तेल टाकुन त्यात कान्दा टमाटा पर्तुन घ्या.मग त्यात बिर्यानि मसाला टाका.मग मटार आनि टोफुचे काप टाका. मिठ व एक वाटि दहि आनि थोडे पाणि घाला.

दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा”

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 14/02/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
दासनवमीच्या निमित्ताने श्री समर्थ चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून काही प्रश्न काढले आहेत , त्यातील पहिले २५ प्रश्न : १ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ? २ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ? ३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ? ४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ? ५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्‍या नदीचे नाव काय ? ६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ? ७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव कोणते ? ८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ? ९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक

जीवनगाणे - ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 14/02/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोझलिंड फ्रॅंकलीन विज्ञानातल्या काही शोधांमुळे विज्ञानाला नवे परिमाण लाभले, नवे वळण मिळालेले आहे. दृष्टीच्या, पंचेंद्रियांच्या क्षमतेच्या मर्यादा मानवाच्या बुद्धीने ओलांडल्या आणि अजोड अशा कल्पनाशक्तीच्या, सर्जनशीलतेच्या जोरावर काही शोध लावले. खरे तर काही वेळा वैज्ञानिक सत्याचा शोध हा आंधळा आणि हत्ती या कथेतल्या आंधळ्यांच्या तर्कासारखा असतो. तरी मानवाने आपल्या अथांग प्रज्ञेच्या जोरावर हे शोध लावलेले आहेत. सूर्यकेंद्री विश्वाचे प्रारूप, न्यूटनचे गतीविषयक नियम, आईनस्टाईनचा व्यापक सापेक्षतेचा नियम, अणूच्या रचनेचे प्रारूप, क्वॉंटम सिद्धांत, ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.

चिकन कबाब

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 14/02/2014 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन कबाब: चिकन कबाब झटपट साहित्य : २०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे, ताजे दही: ४ चमचे, अर्ध्या लिंबाचा रस, हळद: १ चमचा, तिखट: १/२ चमचा, गोडामसाला:१/२ चमचा धनेपूड: २ चमचे, मिरीपूड: पाव चमचा मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे तेल: ३ चमचे