Skip to main content

भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 01/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी. http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trou… वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे.

गणपत आणी कोंबड्या

लेखक मनोजकुमार यांनी शनिवार, 01/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत आणी कोंबड्या गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे. कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ. सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे.

गुडबाय, अमेरिका!

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 01/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्‍हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्‍याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ३ : ख्मेर राजधानी "अंगकोर"

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 01/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

भारतरत्न (?) विराट कोहली (??)

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्‍यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्‍यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले.

ज्योतिषशास्त्राचा फायदा

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.

निरागस

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचे अजूनही काही लक्षण दिसत नव्हते. लागोपाठ तिस-या वर्षी दिसणा-या दुष्काळच्या सावटाने लोक चिंताक्रांत होते. " आज संध्याकाळी सगळी संगत पावसासाठी प्रार्थना करायला गुरुद्वारात जमणार आहे " सरदार सोहन सिंग शौकत अलींना सांगत होते. " हो तेवढंच उरलंय आपल्या हातात, प्रार्थनाच करू शकतो आपण, जर ह्या वर्षीही पाउस आला नाही तर कठीणच दिसतंय सगळं " शौकत अली म्हणाले. " आम्ही पण येऊ प्रार्थना करायला? शौकत अलींचा नातू रेहान मधेच म्हणाला. शौकत अलींचे तोंड आश्चर्याने क्षणभर उघडेच राहिले, सरदार सोहन सिंगही गोंधळले. " आमच्या मास्टरजींनी पण सांगितलं आहे सर्वांना पावसासाठी प्रार्थना करायला " रेहान म्हणाला.

शिवरात्र जागवोनी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसाच्या निमित्ताने! नेहमी कामानिमितानी शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्‍याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्‍या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा? सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो!

अजंठा ...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.

मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.