Skip to main content

शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??

लेखक प्रसाद भागवत यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई, फेब्रुवारी १९९२,--- तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे 'सेन्सेक्सने' म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. "काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की ---" एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्‍या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते.

शिक्षा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
म्या लिवत व्हते. आईशप्पत. तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ” म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.” आदी हाताचेच अंगठे पकाडले. समदी हसाया लागली. गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे. गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले. पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली. केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं. पाय दुखायले. येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा. डोळे पुसले. मान वाकडी करून बायेर पायलं. रस्त्यावर मोत्या बसला व्हता.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.

मंगलाष्टक वन्स मोअर - पाणचट टू द कोअर!

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता.

गुजरात विकासाचे मृगजळ..

लेखक बंडा मामा यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे.

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

लेखक साळसकर यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ५ : अंगकोर थोमच्या राजमंदिरवेदिका (State Temple Terraces)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

मधुबाले सारखी ? छे छे, काहीतरीच काय?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
. “डोळे हे जुल्मि गडे… रोखुनी मज पाहू नका ”… च्यामारी, आज पहाटे स्वप्नात पुन्हा मधुबाला, आणि तीही चक्क डोळे हे जुल्मि गडे म्हणणारी ? … अगदी पूर्वी स्वप्नात शिवाजी महाराज, टारझन, वज्रहनुमानमारूती वगैरे यायचे… … आणि आता चक्क मधुबाला ? मजा आहे बेट्या तुझी. चल चहा कर आता. “पाणी-दूध मिसळलं? मिसळलं. साखर टाकली ? टाकली. उकळी आली? आली. चहापत्ती टाकली? टाकली. आलं किसून टाकलं? टाकलं. झाकण ठेऊन ग्यास बंद ? बंद”.

"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता? आमचे सावरकर प्रेम? = नाही त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली.