Skip to main content

घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 08/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे. त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता.

लळा

लेखक समान्तर यांनी शनिवार, 08/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"ती, सपरा कडची माझी." - बहिरा बापू एका फांदी कडे बोट दाखवत म्हणाला. "हा, अन ती आमच्या घरावरची हाय का, ती माझी"- शिरपा आबा एका फांदीला दाखवत म्हणाला. "पण , आबा ती तर लैच बारीक है, निट न्हाय जळायचा तू?"- बापूने (माझे आजोबा) आबाला विचारलं. "आबा तरी कुठं लय जाड है तवा"- काकू (माझी आजी) आबाच्या काटकुळ्या शरीरावर टोमणा मारीत म्हणाली. हे सगळे आमच्या घराच्या ओसरीवर बसून समोरच्या लींबाच्या फांद्यांची आपसात वाटप करून घ्यायचे. दर उरुसाला हे असेच जमायचे अन त्यांच्या इतक्याच जुन्या असलेल्या त्या लिंबाकडे बघत ह्या असल्या गप्पा रंगवायचे.

पौरुषी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 08/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे.
काव्यरस

आदिशक्ती....

लेखक स्मिता श्रीपाद यांनी शुक्रवार, 07/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता... आज अचानक हाती आली.... माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला.... उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक..... नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार, संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!! आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर, माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!! आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती, उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!! कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा, किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!! बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची, कधी भांडणे कधी प्रेमाने जपून
काव्यरस

२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेच्या निवडणूकीच्या जाहीर झाल्या तारखा काही दिवस तरी कमी होईल नेत्यांची खा.खा..... :) ---------------------------------------- आधी बोलवत होतो तेंव्हा केलीत तुम्ही ना ना तिकडे तिकीट न मिळता इकडे लगेच आलात ना.... :) ---------------------------------------- विकासाची मोजदाद करायला सोळा प्रश्णांची प्रश्णावली. येणारी निवडणूकच सांगेल कुणी कुणाची वाट लावली. दिल्लीहून खास गुरुजी पेपर तपासायला आले गुजरातच्या विद्यार्थांना वाटले नाहीत ते 'आप'ले :) --------------------------------------- अमोल केळकर ७/३/१४ www.poertymazi.blogspot.in

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 07/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे.

पंजाबी भरवाँ करेला (भरली कारली)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 07/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः ३-४ लहान कारली (व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे) २-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ कांदा उभा चिरलेला २-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) थोडीशी कोथींबीर १/२ टीस्पून हळद १ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकत

.....हु S श जळली मेली पुरुषजात ती

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 06/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.
"चल गं मी गेलो " असे म्हणाले आणि हे दार लावुन ऑफिसला निघुन गेले. जरा वेळाने स्वंयपाक घरातुन बाहेर आले. म्ह्टंल सकाळपासुन नुसतं काम काम.