Skip to main content

अंगठी अनामिकेत का ?

लेखक अक्शु यांनी गुरुवार, 17/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब. . . त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक. . . अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक. . . मधले बोट म्हणजे आपण स्वत: . . चौथे अनामिका...म्हणजे आपला जोडीदार, . . तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये. . . . ही झाली गृहीतकं.आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती. . . . . हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा. . . मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. . . कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात. . . अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा.तीही उघडतील.कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत.स्वत:ची आयुष्यं आहेत. . . आता ती बोटं जुळवून आपल्या करंगळ्या उघडा. . . त्याही उघडतील.कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत. . . . . आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा. . . . . आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.ते सुखात आणि दु:खातही एकमेकांना साथ देतआआत आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?
लेखनविषय:

वाचने 24059
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

हो व्हिडिओ पाहिलाय मी याचा. बाकी अंगठी अनामिकेत का घालतात माहित नाही. मी तर लग्नात अंगठी वगैरे काही घातली नव्हती

अनामिकेचे माहीत नाही पण , जोडवीची वाट्टेल ती अंधश्रद्धाळू गृहीतके ऐकली आहेत. पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!!

In reply to by शुचि

>>> पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड >>> हे नक्कीच मिथक आहे, याचा मी 'जीताजागता सबुत'...!!

In reply to by स्वप्नांची राणी

मग पुरुषांनी पण घालायची ना जोडवी. म्हण्जे त्यांचाही मेंदू थंड राहील की. त्यांनाही गरज आहेच की.

In reply to by शुचि

तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो. कुछ भी!!! पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड
भिकबाळी पुरुषांच्या उजव्या कानामध्ये टोचून घेण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे. पेशवाईच्या काळात त्याचे संदर्भ आढळतात. आणि त्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर होणे- हे 'कुछ भी' नसून खरोखर मेन्दूला अधिक सतर्क ठेवण्यासाठी भिकबाळी वापरली जायची. पूर्वीच्या काळी शक्यतो ब्राह्मणच ही वापरत असत. शुद्ध सोन्यामध्ये विविध प्रकारची रत्ने, मोती, माणिक इ. वापरून भिकबाळी बनवली जात असे. त्याचप्रमाणे भिकबाळी वापरणे हे प्रतिष्ठेचेही मानले जाई. आजकाल काय कुणीही फॅशन म्हणून भिकबाळी वापरू शकतं....अनेक ठिकाणी कल्चर्ड मोती आणि स्टोन्स लटकवलेल्या भिकबाळ्या बघायला मिळतात. अर्थात या चापा'च्याही मिळतात. पण सोन्याची रया या तारेला नक्कीच येत नाही. सोने आणि चांदी जितके अंगावर राहील.. तितके शरीराला चांगले असते. अर्थात सध्याच्या जमान्यात सोने-चांदी जास्त प्रमाणात अंगावर मिरवणे धोकादायकही आहे. लहान मुलांनादेखील गुटी उगाळताना त्यात सोनेही उगाळले जाते. तसेच हिन्दु धर्मात- लहान मुलांचे कानही पहिल्यांदा टोचताना सोनेच वापरले जाते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या पायात जी जोडवी असतात.. तिचाही खरोखर मेंदूशी संबंध असतो.. ती जोडवी चांदीची असतील.. तर अतिउत्तम!!!.. पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात मुख्यत्वेकरून जोडवी घतली जातात. आणि इतर बोटांत मासळ्या वगैरे असतात. डोक्याला थंडावा हवा असेल.. तर पाय, तळपाय शीतल राहणं म्हत्वाचं असतं. आणि चांदी ही थन्ड गुणधर्माची असते. म्हणून तर पायामध्ये चांदीचे पैंजण घालायची पद्धत आहे. लहान मुलांच्या पायातही चांदीचे किंवा तांब्याचे वाळे घालतात. लग्न झालेल्या स्त्रियांच्या शरीरात लग्नानंतर त्यांच्या शारीरिक बदलांमुळे अधिक उष्णता निर्माण होते.. त्यामुळे पैंजणांच्या बरोबरच जोडवीही घातली जातात. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेल्या आहेत.. त्या पूर्णपणे सर्वांगीण अभ्यास करूनच. फक्त आपण त्या गोष्टी आणि त्या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे. पूर्वीच्या स्त्रिया या सगळ्या चालीरीतींचं आणि दागिने घालण्याचेही पालन करायच्या. अर्थात सध्या काही नोकरदार महिलांना या सगळ्या गोष्टी फॉलो करायला वेळही नसतो. किन्वा या महिला त्यासाठी कम्फर्टेबल नसतात. पण त्यामुळे या दागिन्यांचं किन्वा ते घालण्यामागचं शास्त्रीय कारण व महत्व त्यामुळे कमी होत नाही.. हेही तितकंच खरं!!!!!!!

मिसळपाव वर स्वागत असो!!! (एप्रिल २०१४ कोटा पूर्ण!)

In reply to by पिवळा डांबिस

@एप्रिल २०१४ कोटा पूर्ण! हा काय नवीन लेखांचा कोटा का काय महिनेवारी ठरलेला?

@आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?>>> हे असं छान छान बरच काही "भावपूर्ण" असं सहज 'तयार' करता येत. त्यात काही विशेष अवघड नाही. अवघड आहे ते वापरता येणं!

In reply to by अत्रुप्त आत्मा

मित्रा, हे काय कोणीही करेल. सोप्प आहे. अहो, एखादे नमुन्या दाखल करून पेश करा. वापरून पाहायला कसे जमवावे ते मिपाकरांच्या वर सोपवा. ही विनंती!

In reply to by इरसाल

>>पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे कोणता अक्षय आहे ? तुमच्या इतकंच इरसाल उत्तर होतं, पण म्हणलं प्रत्येक धाग्यावर जीभेला धार लावून आल्यागत लिहीलं तर बरं दिसायचं नाही.

तुम्ही रोज कि नै संध्यानंद वाचत जा. तिथे असल्या असंख साध्या-साध्या, सहज गोष्टींना खुप महत्व देवुन, छापौन आणतात.

In reply to by प्रमोद देर्देकर

गाडीत रोज किमान एकतरी संध्यानंद असतोच कोणाकडेतरी. रेल्वेचा प्रवास सुसह्य करण्यासाठी छान टीपी आहे.

आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत आश्चर्य वाटले नाही कारण माझ्या अनामिका वेगळ्या होत आहेत. कदाचित बायको आता ८-१० दिवसासाठी माहेरी जात आहे म्हणुन असावे. ती परत आली की पुन्हा वेगळ्या होणार नाहीत असे वाटते. विनोदाचा भाग सोडला तर जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ?

In reply to by इरसाल

@जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ? किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ? त्यांनी अंगठ्या घालून नात्याची सुरुवात केलेली नसते.त्यामुळे वेगळ्या झाल्या अनामिका तरी काही फरक पडत नाही.

पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्टीका धिष्टीत कालिदास: अद्यापि तत्तुल्य कवे: अभवत अनामिका सार्थवती बभूव आपण नेहमी अंक मोजावयाची सुरुवात करंगळी (कनिष्टीका) पासून करतो. या पद्धतीवर आधारित वरील सुभाषित आहे आणि कालिदास हा सर्वात थोर कवि असल्याचे दाखवले आहे. 'पूर्वी कवींची गणना करायला सुरुवात केल्यावर करंगळी वर पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले. त्यानंतर पूढच्या बोटावर नाव घेण्यासाठी कालिदासाच्या तोडीचा कोणी कवि आजपर्यंत न सापडल्यामुळे त्या बोटाचे नाव अनामिका असे पडले.'

अनामिकेतील शीर/ वाहिनी थेट हृदयापर्यंत जाते आपल्या हृदयात सदैव आपल्या जीवनसाथिचे प्रेम असावे म्हणून अनामिकेत अंगठी घालतात महितीचा स्त्रोत : DDLJ picture मधील संवाद !

In reply to by Prajakta२१

स्त्रोत वाचून भडभडून आलं. हृदय बंद पडायची वेळ आली होती पण अनामिका दाबून दाबून रक्तपुरवठा वाढवला हृदयाचा.

In reply to by चाणक्य

बरोबर आहे ते .. हृदयामधून मुख्य धमनी बाहेर पडते आणि तिला फाटे फुटत जातात .. पण अनामिकेला जाणारी वाहिनी ही त्या मुख्य धमनीचे डायरेक्ट कंटीन्युएशन असते. असे आम्हाला मेडिकल कालिजात सांगितले होते. आणि हो, अनामिका दाबून हृदयाचा रक्तपुरवठा वाढत नाही, हे म्हणजे नळाच्या आशिर्वादाने पाऊस पडण्याचा प्रकार होईल. :)

>>>> पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. आश्चर्य आहे. अंगठ्या घालणार्‍यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण पाहता हे कांही खरं वाटत नाही.

खरे म्हणजे अंगठ्यात घालतात ती अंगठी, अशी साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे. ही अनामिका कुठून आली मध्येच? ;) (अंगठीनिरक्षर) सुनील

शाळेत दुसरीमध्ये असताना वर्ग्मैत्रीणीने हे सगळ्यांना सांगुन भाव खाल्लेला आठवतोय ...कैच्याकै लॉजिक

छान माहिती आहेfingerring विषयी.... अस्मादिकांनी सर्व letters व्यवस्थित टंकून कोटी करायचा मोह टाळलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

बहुभाषाकोविद दस्तुरखुद्द रा.रा.श्री बॅटमॅन यांसकडून वाखाणनी पावल्याने अंगावर मूठभर मांस चढले असे... त्याच्यानी आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा... आमच्याकं संकष्टी नस्ति आन संकष्ट चतुर्थी तं कव्हायबि नास्ति. तव्हा सुदरायचं सांगशान तं आम्हि आयकत नस्तो ओ ;-) ;-) ;-) भाषाप्रेमी(मावळी)भ्यिडिस्त

In reply to by भीडस्त

आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा...
ऐला, नक्की मोदकच मुर्गळणार आहात की दुसरे काही ;) वशाट- टु बी स्पेषिफिक. तसेही वशाटाचं सारण भरलेले मोदक मिळतातच म्हणा चायनीजवाल्यांकडं ;)

In reply to by बॅटमॅन

खारयातले दोन दोन बाऊ खाऊ.... सातों दिन भगवानके क्या मंगल क्या पीर जिस दिन सोये देर तक भूखा रहे फकीर -- हा तकिया कलम असणारा काफिर फ़क़ीर

व्याकरण आणि शुद्ध लेखन आवडले शालजोडीतला नसावा असं वाटतंय.... ;-);-)

In reply to by भीडस्त

प्यारेराया??? प्यारेराया वरुन खालील तीन गाणी आठवली, नको प्यारेराया अंत अता पाहु व्याकरण हे सर्वथा पाहु नये, भीडस्त रावांनी मजे मधे लिहीले सिरीयसली त्यास घेउ नये दुसर गाण, सुध्दलेखन कधी का कुनाच चुकल, दोश न द्यावा फुका प्यारेराया मला टेंपोत बसवु नका किंवा तिसर मिपा येतय बहरात भावड्या, नका शोधु डोळ्यातल कूसू, प्यारे राया चला टेंपो मधी बसू अशी गाणी आठवली

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबोआ लेखणी सिद्धहस्त आहे अगदी.... मिपाचे 'गदिमा'ही खिताबत आपणास बहाल व्हायला काही प्रत्यवाय नसावा. :-D :-D :-D

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही.

भीडस्त , आता नाव बदलाच. ;) आणि राया म्हटल्याबद्दल नेमकं 'काय' म्हणावं ह्या संभ्रमात आहोत. पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू!

In reply to by प्यारे१

राया म्हणजे राजा असतंय ना राव.. रामराया,देवराया आठवा की जरा ;-) दाते कर्वे शब्दकोष पृष्ठ क्रमांक २६२० राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् तसेच मोल्सवर्थ शब्दकोष पृष्ठ क्रमांक ६९३ राया [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously हे नजरेत राहूद्या. लयीच हूलझपट कराया लावली मित्रा तुम्ह्या. :-D :-D

In reply to by प्यारे१

छिद्रान्वेष आजच्यापुरता पुरे करावा असं वाटल्याने पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू हे दुर्लक्षिले आहे. ;-) ;-)

In reply to by प्यारे१

नका हे नवं ओझ आमच्यावर लादू. तरुण पणी आम्ही बाजीरावा सारखे दिसत होतो खरे, पण तेव्हा कोणी मस्तानी दिली नाही. आता या वयात घरी काशीबाई आहेत तेवढंच पुरे वाटत. फार दगदग केली तरी गुढगे दुखतात हो आजकाल. मस्तानी वगेरे तुमच्या सारख्या तरुणांना ठिक आहे. सध्या आम्ही आलं घातलेल्या कपभर चहातच आनंद शोधतो.

पर्दापणातच हाफ शेंच्युरी माराणार्या अक्शु भौ चे हार्दिक अभिनंदन . चेपु च्या पोस्टला प्रतिसाद देणार्या मिपाकरांचे जाहिर आभार . शुभेच्छुक-जेपी आणी समस्त 'मी पयला क्लब' सदस्य.

असे कळले की पाश्च्यात्यांमधे अंगठी डाव्या हातात घालण्याचे प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोक उजव्या हाताचा वापर जास्ती करत असल्याने (डावखुरे अपवाद वगळता) त्या मौल्यवान धातू/ खड्याची झीज कमी व्हावी/ सहज चरे पडू नयेत. आता त्यातही कमीत कमी वापर करंगळीचा केला जातो पण करंगळी फारच छोटी असल्याने त्या अंगठीवर कलाकुसर करण्यास फारच कमी वाव राहतो म्हणून मग अनामिका. आता असाच प्रॅक्टिकल विचार करता भारतात डाव्या हातात न घालण्याचे कारण म्हणजे डावा हात = धुता हात हे असावे बहुधा.