नरकचतुर्दशी
दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा.
मिसळपाव