Skip to main content

संवेदनशीलता

लेखक सह्यमित्र यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला . अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

होमिओपाथी म्हणजे फसवाफसवी ? हो

लेखक शरद यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
होमिओपाथी ( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !) माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख.

वाघाच्या जबड्यात

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कालची धक्कादायक बातमी अनेकांनी वाचली असेलच. दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात झालेली घटना. एक २० वर्षाचा तरूण पांढ-या वाघाच्या खंदकात्/पिंज-यात पडला आणि वाघाने त्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ऐकायला वाचायला मिळालेली काही मतं आणि त्यावर माझे विचार खालीलप्रमाणे. १) पण तो पडला कसा पहिले म्हणजे? - महत्वाचं हे आहे की सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन यंत्रणा गेली कुठे? २) त्याच्याच उंगल्या नडल्या. / तो नशेत होता / त्याने आत्महत्या करायला उडी मारली असावी - हे काहीही असेल तरी ते काय आहे ते नंतर बघता आलं असतं.

|| मंगलमय दिन ||

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार. मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ५

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१८५० १० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला! मॅक्क्युलरने उत्तरेची वाट धरली.

एक शाम ऋजुता के नाम

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 24/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
२१ सप्टेंबर २०१४: प्रसिद्ध आहारतज्ञ 'ऋजुता दिवेकर' यांचे न्यूयॉर्कमध्ये सेन्ट्रल पार्क मध्ये एक छोटेसे सत्र होते. सेन्ट्रल पार्क हे सुद्धा न्यूयॉर्क मधील आश्चर्यच म्हणायला हवे. जगातल्या सर्वात महाग शहरांपैकी एक अशा या न्यूयॉर्कमध्ये ७०० एकर एवढा मोठा भूभाग बागेसाठी राखवून ठेवला आहे याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.

मराठी शिलालेखांतील शापवचने

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 23/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत.

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 23/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास तीन महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच. साहजिकच आत्मीय (?) सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे? मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला, धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पाठवीले याची.

कोळाच्या शेंगा

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 23/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्‍या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका. Shenga 1 साहित्यः १. उकडलेल्या शेंगा - १ बाउल २. अर्ध्या नारळाचं घट्ट दुध ३. चिंचेचा कोळ - पाव वाटि ४. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे ५.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ४

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 23/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला. १ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला.