स्वायत्त महाराष्ट्र
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली.
यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे.
यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की.
विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे.
मिसळपाव