Skip to main content

अंधारक्षण - प्रास्ताविक

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 29/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारक्षण - प्रास्ताविक देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय करतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं. दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले.

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

लेखक आनन्दा यांनी सोमवार, 29/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

उपवासाचा पौष्टिक चिवडा

लेखक मीराताई यांनी रविवार, 28/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
उपवासाचा पौष्टिक चिवडा 1 साहित्यः नायलॉन साबूदाणा डिंक शेंगदाणे सुक्या खोबर्‍याचे काप काजू-बेदाणे बटाट्याचा खिस (वाळवलेला) (वरील सर्व एक-एक वाटी) तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे) 2 कृती: तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत.

आदिशक्ती महादेवी

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 28/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं. सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून. लज्जागौरी लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले.

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

लेखक माहितगार यांनी रविवार, 28/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा.

दिसली समद्यांना ...

लेखक आतिवास यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय.

अम्मा

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते.

कुणी जाल का सांगाल का

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!