Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 31/01/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे. पुढे चालू... ======================= आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो.

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

लेखक स्वप्नांची राणी यांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

मागे राहिली आवली ......

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 31/01/2015 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली सावधान म्हणताच, पाशातून सुटलात तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली जया अंगी मोठेपण तया यातना कठीण त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली

अमृतसर ५ - खादाडी

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 30/01/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
1 पंजाबी खाणं म्हटलं की डोळ्यापुढे सरसो का साग, मकई रोटी, छोले भटुरे, आलु गोबी, तडका दाल, पनीर चे नाना चमचमीत पदार्थ, खुसखुशीत रोट्या, नान, पराठे, कुलचे डोळ्यापुढे येतात. जोडीला पंचरंगा आचार आणि मसाला पापड हवेतच. भरल्या पोटी हौसेनं लस्सी हाणणं आलच.

च वै तू हि आणि मराठी मालिका ....

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 30/01/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत काव्यामध्ये च वै तू हि ह्याचे अनन्यसाधारण महत्व आहे ...फिलर्स म्हणून अतिशय कामास येणारे हल्ली मराठी मालिकांमधील काही संवाद ... अत्यंत फुटकळ बाबही काहीतरी विशेष महत्वाची असल्यासारखे दाखवणे ...तसेच काही दृश्यांकने ह्या फिलर्स सारखे पण अत्यंत डोक्यात जाणारे १. कुणीही कुठूनही बाहेरून आले कि : तू 'फ्रेश' होऊन ये ...अरे तो/ती फ्रेशच दिसत असतांना पुन्हा काय ...आणि हात पाय धुवून घे असे सोपे वाक्य नाही ...फ्रेश होऊन ये २. कोणताही तणाव आला कि : त्याला / तिला थोडा वेळ दे किंवा तू आधी/थोडी शांत हो ३.

पिक्चरगाथा ('टॉरेंटगाथा'वरून प्रेरित)

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 30/01/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी -अपूर्व ओक डिस्क्लेमरः कवितेत व्यक्त झालेले शब्द, भाव व अर्थ काल्पनिक असून कव

अतिद्रुत लयकारी अतितार सप्तक

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 30/01/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
तर हल्ली त्या इनसिंक वरचे वादक / गायक बघितले कि साधारण लयीत बरोबर चाललेले अचानक तिहायांवर तिहाया आणि काहीतरी तिरकीत धीराकीत करीत समेवर येऊन एकमेकांकडे 'जितं मया' थाटात बघतात हे बघून मला आमच्या गुरुजींनी सांगितलेले काही जुने किस्से आठवले १. एका प्रख्यात सतारवादक आणि व्हायोलीन वादकाची जुगलबंदी चालू होती ..प्रत्येकाच्या साथीला १ १ मशहूर तबलजी ... जो वाजवत असेल त्याचा तबलजी त्याची साथ करत असे...दोघेही वाजवतांना दोन्ही तबलजी वाजवत होते ...हळू हळू एक जण वाजवतांना दुप्पट तिप्पट चौपट अशा चढत्या लयीत वाजवून मैफिल काबीज करू लागला ...

प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 30/01/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः ३ वाट्या तांदूळ १ वाटी उडदाची डाळ ३/४ वाटी मूग डाळ १/२ वाटी तूरीची डाळ १/२ वाटी चणा डाळ १/४ वाटी जाड पोहे ४-५ हिरव्या मिरच्या १ छोटा कांदा कढीपत्ता कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ

टोपणनाव

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात.