Skip to main content

टोमॅटो राईस

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 22/12/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
1 साहित्य 2 वाटया बासमती तांदुळ 5 मिडियम टोमॅटो प्युरी करून 2 मोठे कांदे 3 मिरच्या आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे. साजूक तूप 1/2 वाटी पाव वाटी काजू मीठ साखर कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा. छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार. काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा. 2

वाचने 32292
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

तों.पा.सु, इथेही फोटो नाही??????????

In reply to by त्रिवेणी

जर्मनीत शिकल्या असतील टो.भा. म्हणुनच चव असावी भाताला ओरिगिनल!! होय ना त्रीवेणी?

मस्त रेसिपी. फोटो दिसत नाहीये गं.

मने,छान पाकृ! @त्रिवेणी..माझे किनी बै सासरे फार छान करतात टोमॅटो राईस =))

नेटवरच्या मंजुळा आज्जी, निशामधुलिकावहिनी, चकलीवन्सं, वाहशेफ भावोजी, तरलाकाकू आणि संजीवमामा या सगळ्यांनी केलेल्या टोमॅटो भातापेक्षा तुझा टो भा सोपा आहे मनिमौ... ;) मी नक्की करणार. :) पण मी काय म्हणते, ते तुमच्यात त्यात फोडणी करताना ते हरभरा डाळ नि शेंगादाणे नै घालत का ? त्याने क्रंच का काय येतो म्हणे !!!

प्रिमोकडे जाशील् तेव्हा माझ्याकडेही चक्कर टाक गं. टोमॅटो राईस करायला माझ्याकडेही नाहीत बै सासूबाई-सासरे!

माझ्याकडेहि नाहित सासुबाई-सासरे.त्यामुळे मीच करून बघेन. पा़कृ छान वाटतीये पण फोटो दिसत नाहियेत मौ.

In reply to by सविता००१

अगदी अगदी. मी पण तुमच्या सोबत... अजून एक चिंताग्रस्त अनाहिता मधुरा

In reply to by अजया

आता आपण सुनांवर चर्चा करुयात ना ग!! साबु - साबांवर बोलायचे दिवस (आणी फॅशन) जातील बघ चटकन !!

मी टोमॅटो (१/४ किलो), तांदुळ (१/२ किलो), मीठ (चवीपुरतं) आणि सासु-सासरे (१ जोडी) द्यायला तयार आहे.. कुणीही मला ही रेसेपी करुन द्या...

In reply to by पिलीयन रायडर

...आणि सासु-सासरे (१ जोडी)... अरे बापरे, ही सामिष पा़कृ झाली की मग :) ;) त्याऐवजी, पनीर घालून ही पाकृ शाकाहारी करता येईल का ? *scratch_one-s_head* (हघ्याहेवेसांन)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पनीर,बटाटा,वांगे,तोंड्ली आवडेल ते घ्या. जाता जाता आज माझ्याकडे तोंड्ली भात आहे. उद्या टाकते रेशिपी.

हा हा हा,.. स्वता: करून बघा... हो की नै ग मौ

सासुसासरे मी देतो...त्यांच्यासाठी सुनबै पाठवा माझ्याकडे...सगळे मिळून खाउ टोभा ;)

हे शाब्बास मौ! सोप्पी पाकृ. आजच करते. माझ्या साबांनी कधीच नाही बाई केला हा भात, त्यामुळे आमच्या घरात मीच पयली.

केकता कपुर इश्टाईल मधे वाचा बरं का.. काय?*shok**shok* तुमच्या कडे सासुबाई नाहीयेत?*shok*...... .तुमच्या कडे सासुबाई नाहीयेत? *shok*.......तुमच्या कडे सासुबाई *shok*नाहीयेत?

माझा गणेशा झाला.... असो, निदान रेसीपी तरी समजली. भाताचे कुठलेही प्रकार आवडत असल्याने, हा पदार्थ पण नक्कीच करून बघणार...

माझा आवडता प्रकार! (अवांतरः टवाळाला एक सासूबै शोधून द्या गो! नैतर तुम्ही कसल्या अनाहिता?)

आमच्या सा.बा. चं आणि आमचं अजिबात पटत नसल्यामुळे हा टोमॅटोभात अजिबात खाणार नाही. (सौ.पण अजिबात बनवणार नाहीत. "मिपावरची रेसिपी ना? मग करत बसा तुम्हीच!" हे मला तिने बोलण्याआधीच ऐकू येतंय..!) बादवे, इथल्या कुणा अनाहितांना आमच्यासारख्यांची दया आली आणि एखादं अर्धंमुर्धं आवतण भ्येटलंच तरच कायतरी चानस् हाय! -(आशाळभूत), मीच तो! (रच्याकने, शंभरला अजून किती कमी आहेत? टोभा मिळाल्यास १०० काय, २०० ची पण सुपारी घेतो. बोला... आमचें येथें धाग्याचीं शंभरी भरवायचें कंत्राट स्वीकारलें जाईल - म्हणजें शंभर प्रतिसाद हो! तुम्हांला कांय वाटलें?)

पाटावरच्या पांढर्‍या पाकिटात काय आहे हे कळायला मान खूऽऽऽऽऽऽपच म्हणजे खूपच तिरकी करावी लागली तेव्हा वाचता आले! :-P ते मीठ, साखर आणि कोथिंबिर काही नव्हती 'साहित्य' च्या लिस्टमध्ये. संमं, ते पण करून टाका चला! ;-)

In reply to by एस

अहो पांढर्‍या पाकीटावर काय लीहीलय ते मान तीरकी करूनही दीसत नाहीये. पूर्ण वटवाघळासारखे लटकावे लागणार तेव्हा दिसेल. नाहीतर लॅपटॉप उल्टा करावा लागेल. :)

In reply to by दिपक.कुवेत

मग शिरसान करुन "योगा" प्रेमी असल्याचे ऑफिस मधल्या मंडळींना पटवुन ध्या ! :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant

In reply to by दिपक.कुवेत

पेस्ट बरोबर दिसली पण बाकि सगळे उलटे झाले....

टोभा सारखा सारखा अपडेट होतो आहे, कोथिंबीर कमी पडली काय ? *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

ह्म्म फोटो आले. शेवटल्या फोटोत दोन वाडग्यांच्या मधले दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.

In reply to by सूड

@दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.>>>> घेतालान सूड मेल्यान! :-D