यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे.
मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी.
मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.
पार मगोगत, उपक्रम करून मी पण इथेच पडीक व्हायचे ठरवले आहे.आपली आपली पथारी पसरायची.चार टोळकी जमवून गप्पांचा फड जमवायचा.बाकी ते काऊ-चिऊचे राजकारण आणि इतर न पटणार्या गोष्टी गेल्या खड्ड्यात.
इथे परस्परांत वाद-विवाद होणारच आणि ते व्हायलाच पाहिजेत.पण ते वाद जर संवादाकडे जाणार असतील तर फारच उत्तम.इतर आंतर-जालांचे माहीत नाही पण निदान मिपावर तरी वाद-विवाद, संवादाकडे वळतील ह्याची काळजी संपादक घेत असतात. एक-दोन वेळा काही वेडे-वाकडे लिहील्यामुळे मला पण कानकोंडे झाले होते.पण संपादकांनी आणि त्याहीपेक्षा खर्या मिपाकरांनी (खरे मिपाकर हे एकच जन्म घेतात, चिकाटीवाल्या मिपाकरांची आम्ही गणना करत नाही.) वेळो-वेळी समजून घेतले.
जास्त लिहायची सवय नसल्याने, सुरुवातीला थोडा त्रास पण झाला.त्यावेळी आलेल्या प्रतिसादांनी मन पण थोडे नाराज झाले होते.अशावेळी प्रशांत आणि गणपा ह्यांनी धीर दिला.योग्य शब्दांत चुका सांगीतल्या. पण हळूहळू इथे मित्र मिळाले.किंबहूना ज्यांनी सर्वात जास्त टर उडवली ते तर अधिकच जवळ झाले.
एक उदाहरण देतो.
माझ्या ह्या लेखात (https://www.misalpav.com/node/20742)माझ्या लेखाची टर खेचणारा यकू पण होता.
पुढे तो साल्ला भिXXXट यकू, कधी जिवलग व्यनि मित्र झाला ते समजले पण नाही.पुढे ह्याच यकूने मला हवे असलेले अजुन एक पुस्तक पाठवले.(भेंडी परत एकदा त्या "यकू"च्या आठवणीने अक्षरे धुसर झाली.)
त्यानंतर तर मला मिपावर मदत मागायची सवयच लागली.
दुबईला जातोय? काढा धागा.आहेत कुंदन शेठ.पहिला कट्टा केला तो ह्या कुंदन बरोबर.कोण कुठला मी....ना ओळख ना पाळख.कुंदन स्वतः घ्यायला आला.माझ्या आग्रहाखातर मुद्दाम माझ्यासाठी मेट्रोतून फिरला.
यानबूला जातोय? काढा धागा.आहेत अजय इंगळे.इथे आल्या नंतर दुसर्या दिवशी स्वतः गाडी घेवून आले.मला आवश्यक असलेली खरेदी करायला मदत केली.कधी फोन केला तर वेळात-वेळ काढून मला भेटायला येतात.
मुलाने आकुर्डीच्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश घेतला आणि आता जागा शोधतोय? काढा धागा.मिपाकर येतातच मदतीला.बरे येतात ते फक्त सल्ले द्यायला.मी सांगतो तेच कर.हीच जागा उत्तम.असे कुणीही म्हणाले नाहीत.
मुलाला बाइक हवी आहे? काढला धागा.खुप सल्ले मिळाले.माहिती मिळाली.धर्मराज मुटके ह्यांचे म्हणणे पण पटले.(जाताजाता, बहूदा मुटके साहेबांचेच म्हणणे खरे ठरणार.)
मिपाने खरोखर मला काय दिले असेल तर ते माझी मित्र-मंडळींची हौस भागवली.आपला पण एक सुंदर ग्रूप हवा.थोडी चेष्टा-मस्करी, थोडे वाद-विवाद आणि भरपूर खाणे-पिणे करता करता आपले ज्ञान अधिक सम्रुद्ध व्हावे, अशी मनापासून इच्छा होती.पथारी घेवून फिरलो बराच पण स्थिरावलो, स्थिरावलो म्हणण्यापेक्षा पसरली ती इथेच.
आपण सगळीच माणसे, पण प्रत्येकजण देवास्वरूप काहीतरी द्यायचा विचार करत असतो.
कधी कधी उत्तम विचार मिळतात, तर कधी चविष्ट पाकक्रुती, कधी सुंदर फोटोग्राफी, तर कधी फोटोग्राफी म्हणजे नक्की काय? ते शिकवणारी स्वॅप्स ह्यांची लेखमाल देखील..(अर्थात इतकी सुंदर लेखमाला आमच्या कॅमेराला वाचता येत नसल्याने आम्ही काढलेले फोटो यथातथाच येतात, तो दोष आमचा आहे.सध्या स्वॅप्स आमच्यावर नाराज आहेत.पण भेटलो की मला नक्कीच माफ करतील.प्रायश्र्चित्त म्हणून चिंचेची चटणी आणि बटाटेवडे (चिंचबव) खायला पण तयार आहे.बायकोसाठी दाबेली खाऊ शकतो तर मित्रापुढे "चिंचबव" काय चीज़?)
फोटोग्राफी सारखीच, आम्हाला अजिबात न जमणारी, आणखी एक कला म्हणजे चित्रकला.इथे भले-भले चित्रकार (चित्रगुप्त, बबन ताम्बे, ही पटकन आठवलेली नावे)लीलया चित्र काढतात. ते बघून जळजळ न होता, उलट त्यांच्या कलेचे कौतूकच करावेसे वाटते.
कधी कंटाळा आलाच तर वाचायला पर्यटन विभाग आहे.त्यात घुसायचे आणि विना तिकीट आणि विना पासपोर्ट सगळीकडे भटकून यायचे.
अद्याप माझी नर्मदा परीक्रमा सुरुच आहे, जसे जसे उत्तम अनुभव येतील तसे नक्कीच सांगीन.आमच्या मनांत उत्तम अनुभवच राहतात.वाईट अनुभवांना आम्ही मनांत शिरूच देत नाही.
तुर्तास जय मिपा आणि जय खरे मिपाकर......
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनातले बोललात !!
मनातले बोललात !!
मनोगत भावले
तुमचा मिपावावर प्रेरणादायी वाटतो.
मिपाबद्दलच्या तुमच्या भावनांना अनुमोदन.
छान.
च्यायला, कोण कुठली मानसं नात्यातली मानसं नाहीत पण मदतीला हजर. म्ज्जाय मिपा म्हणजे.
बाकी मिपा मिपा करू नका.मिपाचं काम प्रेयसी सारखं आहे, पहिल्यांदा तीच्या सर्व गोष्टी आवडतात आणि मग तू अशीच वागली, तू अशीच बोलली, तू हे कशाला केलं असं सुरु होतं पण तिच्या सर्व गुण अवगुणासह तिला स्वीकारलं की बस लाईफ बन गयी...! :)
च्यायला, या कुंद्यानं तुम्हाला इतका वेळ दिला :( सालं आम्ही वाट्स्पवर काही मेसेज की केला की दहा घंट्याने रिप्लाय करतो, सालं माझ्याच वाटेला वाईट अनुभव आहेत तर.... ;)
-दिलीप बिरुटे
मिपाचं काम प्रेयसी सारखं आहे.....
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"पहिल्यांदा तीच्या सर्व गोष्टी आवडतात आणि मग तू अशीच वागली, तू अशीच बोलली, तू हे कशाला केलं असं सुरु होतं......"
असेल...असेही असेल...
पण आमची आणि मिपाची सुरुवातच भांडणामुळे झालेली, सुरुवातीचे रुसवे-फुगवे, वेळीच दूर झाल्याने आणि पैसा ताई, अपर्णा ताई ह्यांनी समजून घेतल्यामुळे, जास्त दुरावा निर्माण झाला नाही.गणपा आणि प्रशांतने योग्यवेळी मदत केली.धीर दिला.
ते म्हणतात ना, मारणार्यापेक्षा वाचवणारा जास्त आवडायला लागतो, तसेच झाले.
आता तर काय मिपाहीच आमची नर्मदामैय्या असल्याने, आमची समाधी पण इथेच.कदाचित कुणी फुले नाही वाहणार पण निदान कुणी निंदा तरी नक्कीच करणार नाही.शिवाय चुकून माकून कधी वेड्यासारखा वागलो तर, तुम्ही आहातच की कान धरायला.
"सालं माझ्याच वाटेला वाईट अनुभव आहेत तर...."
पण मला तरी तुमचा दोन्ही वेळा अनुभव उत्तम आला, पहिल्यांदा मुलाच्या प्रवेशाच्या वेळी आणि नंतर आत्ता माझी समजूत घालतांना.
@ खटपट्या आणि श्रीरंग,
तुमचे पण मिपाबाबतीत उत्तम अनुभव असतील तर लिहा की.एरवी आपण मारामार्या करतोच, निदान एखादा धागा तरी, उत्तम अनुभवाचा असावा.
नाहीतरी नविन वर्ष येत आहेच.जुनी भांडणे विसरून ह्या नव्या वर्षाचे स्वागत करू या.
अहो हे सर्व आभासी जग
In reply to मिपाचं काम प्रेयसी सारखं आहे..... by मुक्त विहारि
कोण पैसा तै, कोण अपर्णा तै, कोण गणपा कोण प्रशांत हे सर्व जालीय भास. आभासी जगात खुप भावनिक गुंता करून ठेवू नये या मताचा मी आहे.
सालं रावसाहेब म्हणायचे एकदा नेट डिसकनेक्ट केलं जालीय नातं डिसकनेक्ट. आपलं बा असं आहे.
नवीन वर्षाचं स्वागत करू या ! कुठं बसायचं ? :)
-दिलीप बिरुटे
डाक्तर साब . मी कधी असं
In reply to अहो हे सर्व आभासी जग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डाक्तर साब . मी कधी असं बोललो नाय :-/
प्राडॉ अगोदरच म्हणालेत ना की.
In reply to डाक्तर साब . मी कधी असं by अद्द्या
प्राडॉ अगोदरच म्हणालेत ना की...
हे सर्व जालीय भास+D(प्राडॉ हघ्याहेवेसांन)
हा मग ठीक .
In reply to प्राडॉ अगोदरच म्हणालेत ना की. by डॉ सुहास म्हात्रे
हा मग ठीक . :D
राव साहेब....
In reply to डाक्तर साब . मी कधी असं by अद्द्या
रावसाहेब, (उर्फ संजोपराव) साला जिंदादिल माणुस. अतिशय खवट. खवटपणा मान्य, सालं तुमच्या मिसळपाववर शुद्धलेखनाची गोडी एकाला नै. अतिशय पांचट प्रतिसाद लिहिणारे लिहित असतात. आम्ही तुमच्या मिपावर पाय ठेवणार नै. मिपावर तुमचा सतत क्यामेरा. तुम्हाला आमचे रामदास आवडतात. आमचा अमुक धमुक आवडतो, हे चांगले लिहितात, ते चांगले लिहितात, याचंही लेखन छान असतं. सालं तुम्हाला मिपा आवडतं, नै लिहिणारेही खुप आवडतात. पण तुम्हाला आमच्या मिपावर पाय ठेवायचं जिवावर येतं. (नका ठेवू पाय आमचं मिपा बंद थोडी पडलं. ) सालं आम्ही इज्जत केली रावसाहेब तुमच्या जीए.च्या कथांच्या अभ्यासासाची, तुमच्या कल्पक कोट्यांची, अगदी शुद्धलेखनासहित, आम्ही तुमचे सर्व मान अपमान सहन केलेत. आम्ही कडवट बोलतो तुम्हीही कधीही कमी केली नै. सालं तेही दिवस मजेचेच होते. असो, मीस यु.
-दिलीप बिरुटे
प्रोफे 'सर' . एक मिनिट .
In reply to राव साहेब.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रोफे 'सर' . एक मिनिट . संजोपराव हि जर कुठली आयडी असेल . तर तो मी नव्हेच .
सफेद झुट बिरुटे साहेब सफेद झुट
In reply to अहो हे सर्व आभासी जग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरी मी तुम्हाला व्यक्तीगत ओळखत नसलो तरी मी खात्रीपुर्वक सांगतो
तुम्ही खोट बोलत आहात
यु आर द मोस्ट इमोशनल मॅन
मी माइंड रीडर आहे मी गॅरंटी ने सांगु शकतो तुम्ही अस कधीच डिसकनेक्ट करु शकला नाहित आजपर्यंत
कोणालाच नाही
ये सब बकवास है.
प्रा डॉ
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येतो एकदा औरंगाबादला.....
बाकी मुवि काका,माझ्या आठवणी प्रमाणे आपले दोन कट्टे झाले. रॉकींग कट्टा इसरले का , टाकु का फोटो इथे? ;-)
टाक...
In reply to प्रा डॉ by कुंदन
आपला पहिला कट्टा एकदम रापचिक होता.
खूप दिवसांनी मन मो़कळे झाले होते.
त्या रम्य आठवणी परत जाग्या झाल्या....
हे सर्व जालीय भास....
ते तसे होवू नये म्हणून तर जसे जमेल तसे कट्टे करतोच की...
नाहीतर इस्पिक एक्क्यांच्या आड दडलेला सामान्य माणूस कसा काय दिसला असता? किंवा प्रभाकर दादांच्या आड दडलेला तरूण कसा काय दिसला असता?
आणि शिवाय नाही म्हटले तरी लेखनाच्या मागचा माणूस ओळखायला जास्त कष्ट पडत नाहीत.एखाद-दुसरा अपवाद असणारच.एक-दोन नासके आंबे निघाल्यामुळे करंडीला दोष देण्यात काही अर्थ नाही.तितकी मनाची तयारी असेल तरच आंब्याच्या मागे धावावे.
नविन वर्षाच्या स्वागताला "संभाजीनगरला" येणे जरा कठीणच आहे.
शिवाय फेब्रुवारीतल्या ट्रिपचे पण प्लॅनिंग पुण्यापर्यंत आणि लातूरपर्यंतच आहे.
त्यामुळे आपण भेटलो की त्याच दिवशी नविन वर्ष साजरे करू.
जे भेटले ते चांगले वाटले
जे भेटले ते चांगले वाटले (याचा खरा अर्थ अजून तरी वाईट अनुभव नाही ;) )
जे नाही भेटले ते कधीतरी भेटतील...जे कधीच नाही भेटणार "चिउ-काउ" ...त्यांच्यासाठी "नेट डिसकनेक्ट केलं जालीय नातं डिसकनेक्ट" :D
आवडलं
खूप छान लिहिता मुवि तुम्ही. मग ते "मुलांची शेती" असो, की "छगनलाल". अगदी मनापासून लिहिलेले आणि वाचनीय. हा लेखही सुंदर. तुमच्या मनात आतबाहेर काही फरक नाही हे माहित आहे. तुम्हाला मिपावर काही खटकलं तरी ते सांगण्याची तुमची पद्धतही एकदम अंगावर धावून जाणारी नसते. असेच रहा. आणि माझंही काही चुकलं असं तुम्हाला कधी वाटलं किंवा पटलं नाही तरी संवाद असाच चालू राहू दे.
माझंही काही चुकलं असं तुम्हाला कधी वाटलं...
In reply to आवडलं by पैसा
.....किंवा पटलं नाही तरी संवाद असाच चालू राहू दे."
जरूर....
मंजूर.......
सुरेख
खूप मस्त लिहिता हो मुवि तुम्ही!
अगदी आवडलं आणि पटलंही.
मुवि मस्त लिहिलंय.उत्तम ते
मुवि मस्त लिहिलंय.उत्तम ते घ्यावे,वाईट सोडुन द्यावे.मिपाधर्म सांभाळावा आणि वाढवावा हेच तत्व खरे!
मनापासून आवडलं...
मनापासून आवडलं...
मस्त मुवि. छान मनोगत मांडलत.
मस्त मुवि.
छान मनोगत मांडलत.
लेख आवडला
याला अगदी +१००. आणि मी खरे पण आहे आणि मिपाकरही आहे त्यामुळे हे अधिकच पटण्यासारखे आहे :)
जय मिपा
जय मिपा !
सुंदर मनमोकळे मनोगत !
सुंदर मनमोकळे मनोगत !
आयुष्यात भावना प्रधान भेटलीच
आयुष्यात भावना प्रधान भेटलीच नाही कधी. नर्मदेतले गोटे आम्ही काय करणार. थोडेफार ओले झालो वाचून.
सुंदर
सुंदर लेखन मुवी !
मिपा खरंच मज्जा आहे :)
इथे चांगले अनुभवही येतात अन वाईट अनुभवही येतात .... आपण दोन्हीमध्ये साम्यावस्थे राहायला शिकलो की मह मिपावरच्या गप्पा अन नर्मदा परिक्रमा ह्यात काहीच फरक रहाणार नाही :)
जियो मु.वि.साहेब. आवडले.
जियो मु.वि.साहेब. आवडले.
नर्मदापरिक्रमा करणारे म्हणतात
नर्मदापरिक्रमा करणारे म्हणतात "मैयाला काही मागायचं नसतं ती देतच राहते."
"मैयाला काही मागायचं नसतं ती देतच राहते."
In reply to नर्मदापरिक्रमा करणारे म्हणतात by कंजूस
सहमत...
इथेही वेगळे काय आहे?
क्या बात!
क्या बात!
वा मुवि!
आता फेब्रुवारीला भेटूच!
मनातलं बोललात... मनापासून आवडलं...
मनातलं बोललात... मनापासून आवडलं...
थेट..
आणी नेटके *ok* *OK* आटोपशीर प्रकटन.
सो टका खरे आहे...जय मिपा....
सो टका खरे आहे...जय मिपा....
मुक्तक आवडले !
मुक्तक आवडले ! :)
जय नर्मदा मैया ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant
:-)
मुविसाहेब, तुमच्यावर नाराज नाही हो आम्ही. ते मनातून काढून टाका. बाकी ते 'चिंचबव' मजेशीर होतं. बटाटेवड्यांसोबत तिखटजाळ मिरच्याच खाल्या जातात आमच्याकडेही. त्या पाकृत चिंच-खजुराची चटणी अशीच अॅड केली. दुसरं काय सोप्पं आणि मला जमेल असं सापडलं नाही म्हणून. अजून काय! जेवढं जमलं त्याने खुश होऊन स्वतःच्या नव्यानेच शोध लागलेल्या पाकृकौशल्याचा पहिला आविष्कार मिपाकरांसमोर मांडायला किंचित घाई केली. जाऊ द्या.
बादवे, तिथं मी लिहिलं होतं की वडे मस्त झाले होते, लगेच फस्त झाले. पण खरंतर ते मला एकट्यालाच खायला लागले, असे झाले होते! :-P त्यामुळे परत काही स्वयंपाकघराच्या वाटेला गेलो नाही! जाणार नाही!
(कोणी मिपाकर पुण्यात बटाटेवडे बनवण्याचे क्लासेस घेतात का? परत एकदा खुमखुमी आलीय! :-D)
(व्यनिचं उत्तर सावकाशीनं देईन. डोंट वरी.)
येस्स्स्स्स....
In reply to :-) by एस
फेब्रुवारीत पुण्याला येतोय...तुझ्याकडे तर हक्काने येणार.
मुविकाका, लौकर महा-कट्टा
मुविकाका, लौकर महा-कट्टा अरेंज करा बॉ !
...एकमेका लोटांगणे घालायलाच हवी एकदा !
सुंदर मनोगत
In reply to मुविकाका, लौकर महा-कट्टा by सस्नेह
+१
असेच म्हणते..
मुविकाका, लौकर महा-कट्टा अरेंज करा बॉ !
In reply to मुविकाका, लौकर महा-कट्टा by सस्नेह
महा-कट्टा व्हायलाच पाहिजे.
आज काढतो धागा.
ठिकाण पण बघून ठेवले आहे.
४०-५० माणसांची छान व्यवस्था होइल.
मी आणि कंजूस गेलो होतो.
महा कट्टा उर्फ मिपा
In reply to मुविकाका, लौकर महा-कट्टा अरेंज करा बॉ ! by मुक्त विहारि
महा कट्टा उर्फ मिपा कुलसंमेलनाला महा अनुमोदन.मदतीची तयारी.
बाकी सवळ्यांतल्यांनी
In reply to मुविकाका, लौकर महा-कट्टा by सस्नेह
बाकी सवळ्यांतल्यांनी बहुजनांबरोबर कट्ट्याला येण्याचे ठरवले हे पाहून ड्वाळे पाणावले
टका बाळा,अभ्यास वाढव.
In reply to बाकी सवळ्यांतल्यांनी by टवाळ कार्टा
टका बाळा,अभ्यास वाढव.
अर्रे हो...आय माय स्वारी
In reply to टका बाळा,अभ्यास वाढव. by अजया
अर्रे हो...आय माय स्वारी बर्का...ते जुने काही कट्टे विसरलोच
आवडल
अगदी मनापासून लिहील, आणि आम्हालाही मनापासून आवडल.
मस्त लिहिलंय. आवडलं.
मस्त लिहिलंय. आवडलं.
मिपाने खरोखर मला काय दिले
मिपाने खरोखर मला काय दिले असेल तर ते माझी मित्र-मंडळींची हौस भागवली.आपला पण एक सुंदर ग्रूप हवा.थोडी चेष्टा-मस्करी, थोडे वाद-विवाद आणि भरपूर खाणे-पिणे करता करता आपले ज्ञान अधिक सम्रुद्ध व्हावे, अशी मनापासून इच्छा होती.पथारी घेवून फिरलो बराच पण स्थिरावलो, स्थिरावलो म्हणण्यापेक्षा पसरली ती इथेच. १००% सहमत मुवी, अगदी माझ्या मनातले शब्द आले आहेत.
....छान, अगदी मनापासुन लिहीलय मुवि......!!!!
प्रतिसादही हुरुप वाढविणारे मिळालेत, आता याप्रित्यर्थ मेळावा कधी ???
मेळावा कधी ???
In reply to ....छान, अगदी मनापासुन लिहीलय मुवि......!!!! by विनोद१८
धागा काढला की...https://www.misalpav.com/node/29818
मिपा
मिपावर निरपेक्ष वृत्तीने मदत करणारी खूप जण भेटली . या धाग्याच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटत आहे .
गल्फ जॉब च्य शोधात असताना पेठकर काका, मुवि , कुंदन,मंदार कात्रे यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले . काहीही ओळख किंवा आंजावर फार सक्रीय नसताना देखील त्यांनी सर्व माहिती दिली सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्याची मोलाची मदत झाली.
डॉ. खरे यांनी सुद्धा माझ्या वडिलांच्या आजारपणामध्ये योग्य मार्गदर्शन केले.
गणपा , जागु आणि पेठकर काका यांच्यामुळे कुकिंग टिप्स मिळाल्या आणि लज्जत वाढली .
इथे खफवर दंगा करायला ओळ्ख असावेच लागते असे नाही.
असे अनेक मित्र मिपाने दिले म्हणून मिपा आवडते.
आयला...
In reply to मिपा by कपिलमुनी
मी कधी मदत केली?
मी तर विसरून पण गेलो.
कपिलमुनी तर आता कट्टा करायचाच...
अगदि मनातलं लिहिलं आहेत हो मुवि
ऑफिस मधे कितीहि कामं (??) असली तरी मिपा उघडल्याशीवाय, वाचल्याशीवाय, ईथे मजेशीर प्रतिसाद दिल्या/घेतल्याशीवाय दिवस पुर्ण असा होतच नाहि. बोला मग कधी बसायचं कट्ट्याला?? नंदि पॅलेस वाट बघतय व्बॉ...
माझंही मिपाबद्दलचं मत
माझंही मिपाबद्दलचं मत थोड्याफार फरकाने तुमच्यासारखंच आहे. पण मी असं सेंटी वैगरे लिहायला लागलो तर 'अजि म्या ब्रह्म पाहिले' सारख्या प्रतिक्रिया येतात.
मिपाकर्स रॉक* एवढंच म्हणेन!!
*या रॉकवर दगड वैगरे सारख्या फालतू कोट्या कोणी करायला येऊ नये, आल्यास आमचे शाब्दिक दगड झेलायची तयारी ठेवावी. ;)
तुझ्यावर कोण कोट्या करायची हिम्मत करेल बाबा
In reply to माझंही मिपाबद्दलचं मत by सूड
बस तेरा आयडि नाम हि काफि है...
>>> सेंटी वैगरे
In reply to माझंही मिपाबद्दलचं मत by सूड
>>> सेंटी वैगरे
>>> दगड वैगरे
वैगरे २ वेळा. असो!
मुक्तक आवडले
मुक्तक आवडले
हेच म्हनतो...
In reply to मुक्तक आवडले by समिर२०
मात्र मुवि तुम्ही एकनाथांच्या नंतरचे शांतीब्रम्ह आहात हे ही नाकारुन चालणार नाही. इथल्या एका (अनेक डु आयडी असणार्या) माजी आयडीने आपल्यावर गलिच्छ भाषेत चिखलफेक केली तेव्हा तुम्ही त्या चिखलफेकीकडे दुर्लक्ष करुन शांत राहीलात ती कौतुकास्पद बाब आहे.
लेखातील मतांशी सहमत आहे. आमचे मिपावर अगदी जिवाभावाचे मित्र आहेत*. केवळ त्यांच्यावरील प्रेमापोटी पुणे ते औरंगाबाद (आणि पुढे अजिंठा लेणी) अशा जाऊन येऊनच्या प्रवासात तिकडच्या दगड धोंडयांमध्ये काडीईतकाही रस नसताना एक हाती कार चालवली होती. अर्थात या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी डॉ बिरुटे नावाचा अवलिया प्रत्यक्ष भेटला. आणि ती केवळ मित्रांसाठी इथवर आलो ही भावनाही गायब झाली.
आज कुणी मिपाकर भेटला की मी आवर्जून म्हणतो की पाहूणचार करावा तर बिरुटे सरांनीच. माझ्या म्हणण्याला आमचे नेहमीचे हौशी कलाकार दुजोरा देतीलच. मात्र माझं म्हणणं अनुभवण्यासाठी तुम्हाला औरंगाबादला जावे लागेल. :)
सुखावणारी एक बाब म्हणजे चौराकाका, पैसाताई, पेठकर काका, एक्का काका, नाद खुळा काका, चित्रगुप्त काका ही आमच्या आई वडीलांच्या पीढीतील किंवा त्याच्या आसपासची माणसं आमच्याशी मैत्रीच्या नात्याने वागतात, आमची विचारपूस करतात. प्रसंगी वडीलधार्यांच्या अधिकाराने दटावतातही.
दुसरी मला आनंददायक वाटणारी गोष्ट म्हणजे माझ्या घरी या ना त्या निमित्ताने वीस बावीस मिपाकरांनी हजेरी लावली आहे.पुण्यातील मिपाकरांसोबत यात मुंबईकर, ठाणेकर आणि सोलापूरकरही आहेत.
*माझ्या या म्हणण्याला आक्षेप घेणारी शुन्यवादाची पुरस्कर्ती आयडी शुन्यात विलीन झाली आहे.
मनातले बोललात...
In reply to हेच म्हनतो... by सतिश गावडे
"सुखावणारी एक बाब म्हणजे चौराकाका, पैसाताई, पेठकर काका, एक्का काका, नाद खुळा काका, चित्रगुप्त काका ही आमच्या आई वडीलांच्या पीढीतील किंवा त्याच्या आसपासची माणसं आमच्याशी मैत्रीच्या नात्याने वागतात, आमची विचारपूस करतात. प्रसंगी वडीलधार्यांच्या अधिकाराने दटावतातही."
आणि माफ पण करतात.
अगदी अगदी. मनातलं बोललास.
In reply to हेच म्हनतो... by सतिश गावडे
अगदी अगदी.
मनातलं बोललास.
हो
In reply to हेच म्हनतो... by सतिश गावडे
अगदी अगदी. :)
स.गा. +++१११
In reply to हेच म्हनतो... by सतिश गावडे
धनाजिराव झींदाबाद!!! माणुस शाही झिंदाबाद!!! *HAPPY*
मुवि लेख आवडला.
मुवि लेख आवडला.
अत्यंत खेळीमेळीचं वातावरण, सर्वप्रकारचे उत्कृष्ट लेख, कविता, मार्मिक कोट्या, कधी हलकेफुलके विनोद, अगदी वादविवाद सुद्धा. आम्ही जरा जास्तच वाद घालतो. पर्सनली देखील घेतो कधी तरी. गुदगुल्याचं रुपांतर ओचकारण्यात होतं हेही ठाऊक आहे. पण ठीक आहे. वर्षाखेरीस सिंहावलोकन करावं म्हणतात. ते तेवढंच महत्त्वाचं ठरतं आणि शब्द वापरताना सिंहासारखं वागण्याची जबाबदारी देखील येते. सिंह नसलो तर सिंह बनावं अशी अपेक्षा देखील असतेच. शक्यतोवर प्रयत्न करुच.
बाकी मिपा छान आहे ह्यात वादच नाही. आवडते ह्याबद्दलही आक्षेप नाही.
मिपाचे 'कर्ते धर्ते' ह्यांना मिपाबद्दलचा अभिमान किंवा अहंकार सुद्धा आहे. असायलाच हवा. लोकप्रिय असं हे मराठी संस्थळ आहे. मला खटकतं ते एवढंच की खरंच मिपामुळे'च' (इथं कुठलीही सोशल नेटवर्कींग साईट घ्यावी) ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात हे म्हणण्याबाबत. मिपा नसतं तर जमलं नसतं वगैरे काही आहे का?
कदाचित अस्थानी असेल पण असं एखाद्या गोष्टीबाबतचं अवलंबित्व कितपत खरं असतं?
काही जणांची अवस्था अशी आहे की मिपापूर्वी हे लोक काय करत असावेत असा प्रश्न पडावा.
मित्र किंवा मैत्रिणी मिपाकर, सगळ्या गोष्टी मिपापासून सुरु होऊन मिपापाशी संपतात.
म्हणजे मिपा नसतं तर आपल्या जीवनात भली मोठी पोकळी वगैरे निर्माण झाली असती काय?
(पुन्हा एकदा, मिपा हे फक्त नाव म्हणून घेतोय. चेपु, व्हॉटसअॅप, आणखी कुठली साईट असू शकते)
असं असूनही मिपा आवडतं यात शंका नाही. म्हणणारे मिपा आवडत नाही तरी इथे येतात, का येतात कुणास ठाऊक, आमंत्रण दिलेलं का वगैरे म्हणतील बहुतेक. म्हणोत.
प्यारे १...
In reply to मुवि लेख आवडला. by प्यारे१
"म्हणजे मिपा नसतं तर आपल्या जीवनात भली मोठी पोकळी वगैरे निर्माण झाली असती काय?"
तुमचे माहित नाही, पण माझ्या जीवनात तर होती.
आणि ती भरून काढण्याचे काम "मिपाने" केले.आपण दोघेही कुटुंबवत्सल आणि बर्याच वेळा भारताबाहेर.एकटेपणाचे दू:ख तुम्हाला पण आणि मला देखील.
माणुस तसाही कळपाशिवाय रहात नाही.पुर्वीही तेच होते आणि आता पण तेच आहे.माध्यमे बदलतात पण वस्तूस्थिती तीच राहते.
पुर्वीच्या काळात एखाद्या राजाच्या सभेत राजनर्तकी, राज कवी, राज गायक इत्यादी कलाकार असायचे.एखाद्या मोठ्या समारंभाला बल्लव पण असायचे.(संदर्भ "चांदोबा".)
आता ही तेच आहे.
मिपा,माबो,ऐअ ही पण राज्येच आहेत.बघा पटत असेल तर, नाहीतर सोडून द्या.
बादवे,
तुमच्या बोचकारण्याचा आम्हाला त्रास होत नाही, त्या मागचा स्पर्श आम्हाला माहीत आहे.बिंधास्त बोचकारा.
माझी मराठी आंजा वरील
माझी मराठी आंजा वरील मुशाफिरीला सुरुवात मिपापासुनच झाली. पण मेंबर आय-डी मिळायला फार वेळ लागला. तोपर्य़ंत मी "ऐसी" वर लिहीती झाले. "गमभन" शी जुळवून घेता आलेलं नाही हे मिपावर न लिहीण्याचं अजून एक कारण. तरीही मी मिपाला न नियमितपणे भेट देते. इथले लेख,फोटो,पाकृ,भटकंती म्हणजे मेजवानीच.
कधी कधी प्रतिक्रिया दिल्या तरी पूर्ण असं कधी काही लिहीलेलं नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. मी काही महीन्यांपूर्वी "टेक्निकल रायटींग" बद्द्ल माहीती विचारण्यासाठी धागा काढला होता. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिले. खास उल्लेख करण्यासारखं म्हणजे समीरसूर आणि मूवि यांनी आतिशय माहीतीपूर्ण आणि हिंमत वाढवणारे प्रतिसाद दिले.
थॅंक्स, मिपा.
आभासी जग नेटवरचे: काही
आभासी जग नेटवरचे: काही आइडींचे नाव, फोटो काहीच नसते तरी त्यांचे लेखन आवडीने वाचतो.
श्याला ह्ये मुविपणना अस उगीच
श्याला ह्ये मुविपणना अस उगीच काहीबाही लिहुन जाते बगा. पण लिव्हते येकदम करेक्ट बगा!!
ताई..
In reply to श्याला ह्ये मुविपणना अस उगीच by स्पंदना
तुझ्याकडून हा प्रतिसाद मिळाला आणि खूप बरे वाटले.
तुम्ही एक डाव माफ केलेत आणि आम्ही मिपाकर झालो.
मला वाटतं की 'कट्टा'
मला वाटतं की 'कट्टा' माध्यमातून ''आभास'' आणि ''वास्तव'' यांच्यातलं अंतर कमी होतं (जे काही वेळा त्रासदायकही होऊ शकतं!)
अद्याप तरी आम्हाला कट्ट्याचा त्रासदायक अनुभव आला नाही...
In reply to मला वाटतं की 'कट्टा' by आतिवास
आणि एखाद दुसर्या अपवादापायी, असे नकारार्थी वागणे मला योग्य पण वाटत नाही.
मिपा म्हणजे वाहतं पाणी आहे...
मिपा म्हणजे वाहतं पाणी आहे... जुने जातात आणि नवीन येत रहातात. तसं बघितलं तर नर्मदेची- नदीची उपमा अगदी योग्य आहे.
मिपावरच भेटलेले दोघे जण - ज्यांना अजून जाणून घ्यायला मला फारच आवडले असते आता इथे नाहीत. त्यातले एक - शब्दशः नर्मदा परीक्रमा करणारे- सहा सात महिन्यापूर्वी गायब झाले. दुसरे काल परवा....
:-(
नुसते तसेच नाही...
In reply to मिपा म्हणजे वाहतं पाणी आहे... by असंका
काही काही अवतारी बांबांना नर्मदा मैय्या मोक्ष देते, तसेच इथे पण होते.
पण त्या चिकाटी मंडळींना मिपा इतके आवडते की परत-परत येतात.