पिल्लु
लेखनविषय:
काव्यरस
इवल्याशा डोळ्यातला
भाव तो काय ?
नभातल्या चांदण्याचा
गाव तो हाय
पायातल्या छुमछुमचा
नाद तो काय ?
आनंदाच्या लहरीचा
ठेका तो हाय
बोबड्या भाषेतले
बोल ते काय ?
चिऊच्या घरट्यातले
हे पिल्लु हाय
गोबर्या गालातले
हास्य ते काय ?
बाबांच्या पप्पीचे
हे कारण हाय.
- शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५
वाचने
5311
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सहीच रे गणेशा.
गुपित सांगायचा
भाव तो काय
गणेशाच्या घरला
पाळणा हाय
???? काय????
In reply to गुपित सांगायचा by स्पंदना
गणेशाच्या घरला
पाळणा हाय
+१ फॉर अप्पु ताय :)
लाडु की बर्फी ?
वाह.. मस्तं!
खूप गोड
लय ग्वाड अन द्वाड !
खूप गोग्गोड !!
छान गोडुली !
लई आव्डली !!
:-)
पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हायआ...हा..हा..हा..हा..हा..हा..हा..!!!! सुंsssssssssssदर! :HAPPY:
बर्याच दिवसांनी कविता आली बर वाटलं
खुप सुंदर लिहिलीये. माझ्या लेकीला ऐकवतो आज.
लिहीता रहा रे बाबा.
खुप सुंदर आवडली.
खूप गोड कविता ! खूप छान !
कविता तुमच्या पिल्लुसारखीच गोड आहे.
छान प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार.
गोड आहे!
छान कविता रे गणेशा.
मस्त रे गणेशा, घरी येणार होतास काय झालं त्याचं पुढं ?
खूप आवडली रचना! :-)
सहीच रे गणेशा.