Skip to main content

ती आणि मी

लेखक गरजू पाटिल. यांनी मंगळवार, 09/06/2015 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
(हे अगदी असं असायचं, म्हणून तसंच कवितेत लिहायचा प्रयत्न केलाय. ह्या सप्त्यातलं माझं भविष्य वाचलेलं असून देखील) तिच्या नी माझ्या एकच वाटा, फरक इतकाच... मी जायचा त्या वाटेने आणि ती यायची... आमच्या दिशा वेगळ्या होत्या. तिचे नी माझे थांबे ही एकच, फरक इतकाच...

आत्महत्या!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो येउन गेला. असे म्हणा ना की येण्याची नुसती वर्दी देउन गेला. आताशा तो असेच करतो, नुसते कळवतो आणि कित्येक दिवस मग तोन्ड्च दाखवत नाही. मग कित्येक दिवस मी नुसता तगमगत रहातो. तो आल्यावर काय करायचे याचे बेत डोक्यात घोळवत! पण त्याला सहसा सोयर-सुतक नसते त्याचे. तो ही काय करणार म्हणा...आज काल हवाच अशी वहाते की त्याचाही नाइलाज होत असणार. तो येणार म्हटले ना की खूप तरतरी असते पण....मी विचार करतो, आपण किती वेडे आहोत! तो काही आपल्याकरिता खचितच येत नाही. आपण आपले उगीच त्याला अवास्तव महत्व देउन त्याच्या आजुबजूला आपले जीवन जगत रहातो. मी मग निश्चय करतो, ह्या वेळी आपण तसे नाहीच वागायचे जसे नेहमी वागतो.

पावसात जळाया लागलो...

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 08/06/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो
काव्यरस

गोष्ट ४० तासांची

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 08/06/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या जन्मापासूनच त्याचा प्रवास सुरु झालेला असतो. कधी तो शारीरिक असतो, कधी तो बौद्धिक असतो तर कधी मानसिक असतो. पण राणीचा प्रवास मात्र तिच्यासाठी धम्माल आणि तिच्या आईसाठी झोप उडवणारा ठरला. राणी एक पंचविशीची बिनधास्त तरुणी. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडी रोकठोकच होती. तिच्या रोकठोकणामुळे पंचविशीच्या तरुणीच्या आईच्या मनात जी काळजी यायला हवी तीच तिच्या आई च्या मनात देखील यायला लागली होती, " हिचे सासरी कसे होणार?" त्यामुळे घरात साहजिकपणे कोणतेही शुभ कार्याचे आमंत्रण आले मग ते मुंज असो व लग्न कि त्याचे शेपूट राणीचे लग्न ह्या एकाच विषयाला जोडले जायचे.

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..

मला उमजलेले बॉलीवूड

लेखक शशांक कोणो यांनी सोमवार, 08/06/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. मी ही लहानपणापासून चित्रपट गीतांचा वेडा आहे. अर्थात वयानुसार आवड बदलत गेली कारण तशी संगत होती. नव्वदीच्या दशकात कॉलेज मध्ये असताना ओपी , आर डी , किशोर , आशा आवडत. अनेक वर्षांनी काही दर्दी चित्रपटशौकिनांच्या संपर्कात आल्यामुळे मग ती आवड थोडी मागे सरकत रफी, लता, मदनमोहन, मुकेश इथपर्यंत बदलली.

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

टोकियो स्टोरी...

लेखक पद्मावति यांनी सोमवार, 08/06/2015 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी. साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच...... असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.

तटबंदी

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 08/06/2015 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे त्यांच्या कामाला निघालेल्या बाबांनी चिन्मयला त्याच्या कंपनीच्या गेटपाशी सोडलं. आज सकाळीच त्याची गाडी दोन दिवसांसाठी सर्व्हिसिंगला दिलेली असल्याने त्याने बाबांना राईड मागितली होती. "संध्याकाळी किती वाजता pick up करू?" बाबांनी विचारलं. "सव्वा सहापर्यंत आलात तरी चालेल" "मग असं करतो, आईला बिग बझार मध्ये जायचंय, मी घरी जाऊन तिला घेऊन साडेसहा पर्यंत इथे येतो, आपण तिघेही मग पुढे जाऊयात, चालेल तुला?" "हो, चालेल." म्हणत चिन्मय उतरला.