अमरनाथ यात्रा - माहिती हवी आहे
माझ्या आई आणि बाबांच्या (वय ६० आणि ६५) मनात खूप वर्षे अमरनाथ यात्रा करायचे चालू होते. त्यांनी चार धाम यात्रा ३ वर्षांपूर्वी व्यवस्थित पार पाडली. पण अमरनाथला होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांमुळे आम्ही कायम नकारघंटाच वाजवायचो. शिवाय ते जाऊन आल्याच्या पुढच्याच वर्षी केदारनाथ दुर्घटना झाली. त्यामुळे अमरनाथचा विषयच काढायचा नाही असे बजावले होते. पण त्यांना जायची अतिशय इच्छा असल्याने त्यांनी परस्पर या सीझनची टूर बूक करून टाकली आहे. त्यासोबत वैष्णोदेवी, कत्रा, काश्मीर सुद्धा आहे. आता त्यांना कटकट करण्यापेक्षा त्यांची ट्रीप आरामदायी कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आले.
मिसळपाव