Skip to main content

एक अपघात........ न केलेला.

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 16/06/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया. माझी नणंद सौ.

७ जून - ऐतिहासिक पुणे कट्टा (पुण्यात सगळेच ऐतिहासिक हो)

लेखक टवाळ कार्टा यांनी मंगळवार, 16/06/2015 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा ठाणे कट्टा व्हायच्या आत ७ जूनच्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचे ठरवले होते...नै जम्ले...असो...हा ७ जूनच्या कट्ट्याचा मेगा-मेगाबायटी वृत्तांत :) ६ जूनचा कट्टा रात्री उशीरापर्यंत झाल्याने ७ ची सकाळ आळसावून उठण्यात गेली...सकाळची सर्व आन्हिके आटपायलाच साधारण ११ वाजले. तिथून मोर्चा सूडच्या घरी नेला...तो रात्री न घाबल्ता झोपला हे ऐकून सर्वांनीच कौतीकाने (की खौचटपणे?) त्याची पाठ थोपटली. :) त्याने दिलेला चहा पितापिताच पनीर शेख आजच्या कट्ट्याचे मानाचे टांगारू होणार असे त्याने स्वत:च जाहीर केले...जागतिक मिपातीहासातला हा पहिलाच कट्टा असावा ज्याला खुद्द उत्सवमुर्तीनीच टांग दिली असेल.

एका कोळियाने

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 16/06/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज पार्किंगमधून माझी मोटरसायकल काढायला गेलो, आणि तिथे मला माझी गाडी, एका बाजूची गाडी आणि दुसऱ्या बाजूचा खांब या सगळ्याचा आधार घेऊन कोळ्याने विणलेलं बरंच मोठं जाळं दिसलं. सकाळच्या उन्हात त्या जाळ्याच्या रेषा छान चमकत होत्या. फोटो काढावा असंच दृश्य होतं. पण मी घाईत होतो. एका बाजूला हाताने जाळे साफ करत मी गाडीपर्यंत पोचून गाडीवर बसलो. आणखी हात फिरवून थोडं चेहऱ्यावर आलेलं जाळं काढलं. गाडी काढताना उरलंसुरलं जाळं संपलं. मला थोडं वाईट वाटलं.

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 16/06/2015 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! लदाख़! भारताचा विलक्षण रमणीय प्रदेश! वस्तुत: ते एक ठिकाण किंवा पर्यटन स्थळ नसून एक अद्भुत जगत् आहे! लदाख़ असे जग आहे ज्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत, नद्या, धबधबे, जंगल, दंग करणारे सरोवर, वाळवंट हे सर्व आहे! जणू लदाख़ एक युनिव्हर्स आहे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी एकत्र बघता येतात. चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा ह्या विश्वाचा थोडा आस्वाद घेतला होता, तेव्हापासून इथे परत येण्याची तीव्र ऊर्मी होती. त्यानंतर जेव्हापासून विलक्षण भारतीय ट्रेकर आणि साहसी प्रवासी नीरज जाटचा लदाख़ सायकल प्रवास वाचला, तेव्हापासून मनाशी ठरवलं की, लदाख़ला सायकलवरूनच जायचं.

पाऊस .. तेव्हाचा

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 16/06/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा पाऊस तेव्हा दाटायचा बरोब्बर सात जूनला येवून तो भेटायचा....!! अडचणी होत्या चिकार सर्व दूर करायचा, मन हुरहुरलं की हात तो धरायचा ....!! तेव्हाचा पाऊस खरा खरा पाऊस वाटायचा, प्रत्येकाच्या आठवांत घर तो थाटायचा ....!! लहान, थोर, वडीलधारे आदर तो राखायचा, सार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद तो माखायचा....!! रसायन, फवारे वगैरे लाडावलेला नसायचा, येरे येरे पावसाच्या गाण्यालाही फसायचा....!!!!
काव्यरस

थांबव लपंडाव तुझा रे पावसा

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी मंगळवार, 16/06/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
थांबव लपंडाव तुझा रे पावसा! घे आता तु मनसोक्त बरसुनी. आतुर झाली धरती सजण्यास, जा हीरवा शालू तिला पांघरूनी. यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जून २०१५

जाणवतो तुझा सहवास

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी मंगळवार, 16/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
छबी नजरेसमोर तुझी येते पावसाच्या सरी कोसळताना जाणवतो तुझा सहवास पावसाच्या सरी झेलताना यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जुन २०१५

उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 16/06/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मिसळपाव संकेतस्थळ हे एक येथे नमुद धोरणांच्या परिघात सामुदायिक लेखन वाचन सहभागास अनुमती देणारे खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या नियमांच्या चौकटीच्या मर्यादा सांभाळून संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही लेख धागे काढता येतील प्रतिसाद देता येतील अशी या संकेतस्थळाची रचना आहे. माझे या संकेतस्थळावरील लेखन मुख्यत्वे हौशी लेखन असून ज्या धागालेखांवर प्रताधिकार मुक्ततेची सुस्पष्ट सूचना दिलेली नाही ते लेखन प्रताधिकारीत समजावे.

तू एक विश्वकर्मा

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 16/06/2015 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला लहानपणी मांडीवर घेऊन थापटायची. मी तिचा पदर अंगभर पांघरून घ्यायचो. तिच्या पदरात जगातील मी फारच सुरक्षित व्यक्ती आहे, असे मला वाटायचे. ती मला प्रेमाने विचारीत असे, 'तू मोठेपणी कोण होणार ?' माझे मात्र उत्तर ठरलेलं, 'सुतारमामा!' मग मात्र तिचा माझ्या तोंडावर, नाकावर थोपटण्याचा वेग वाढायचा. "जळलं मेलं तुझं लक्षण! परत अस कुणाला सांगू नकोस," असं ती म्हणायची. मला मात्र याचे कधीच वाईट वाटले नाही. माणसाला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतात त्या त्याने मनसोक्तपणे कराव्यात. लहानपणी सुतार व्यवसायाचे मला खूपच आकर्षण होते.

मी होतो किनारा.................

लेखक झंडुबाम यांनी सोमवार, 15/06/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून . येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून तिचं येणं ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन …………