मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्र स्पर्धा क्र. ७: शांतता: मतदानासाठी धागा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! छायाचित्र स्पर्धा क्र.७ मतदानासाठी हा धागा आहे. या स्पर्धेला अभूतापूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद! सर्व सदस्यांनी आपल्या आवडीच्या छ्याचित्रांना दि. २५/०२/२०१५ पर्यंत भरभरून मतदान करावे ही विनंती! एखादे चित्र चुकून राहिले असेल तर कृपया त्वरित निदर्शनास आणून द्यावे. १ . 1 २. 1 ३. 1 ४. 1 ५. 1 ६. 1 ७. 1 ८. 1 ९. 1 १०. 1 ११. 1 १२. 1 १३. 1 १४. 1 १५. 1 १६. 1 १७. 1 १८. 1 १९. 1 २०. 1 २१. 1 २२. 1 २३. 1 २४. 1 २५. 1 २६. 1 २७. 1 २८. 1 २९. 1 ३०. 1 ३१. 1 ३२. 1 ३३. 1 ३४. 1 ३५. 1 ३६. 1 ३७. 1 ३८. 1 ३९. 1 ४०. 1 ४१. 1 ४२. 1 ४३. 1 ४४. 1 ४५. 1

वाचने 15316 वाचनखूण प्रतिक्रिया 55

_मनश्री_ 18/02/2015 - 21:08
१)८ २)५ ३)१०

तुषार काळभोर 18/02/2015 - 21:11
१. ४२ २. १३ ३. १ बर्‍याच ठिकाणी शांतता अपेक्षितच असते. ती नसेल तर विचित्र वाटतो.. म्हणून हे ३ निवडलेत. जिथे शांतता ह्या शब्दाची कल्पनासुद्धा करवणार नाही, अशा ठिकाणची शांतता कुठेतरी आत घुसल्यासारखी वाटते.

In reply to by तुषार काळभोर

तुषार काळभोर 27/02/2015 - 09:36
असे करता येईल का? स्पर्धकांना ज्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत, त्या संपादक मंडळ आयडीला व्यनिने पाठवाव्यात. शिवाय त्यावर कोणतीही ओळख दर्शवणारी खूण नसावी(उदा वॉटरमार्क) नंतर या धाग्यासारखा धागा उघडण्यात यावा, ज्यात स्पर्धकांची नावे नसतील. स्पर्धकाचे नाव प्रवेशिकेशी जोडून biased निवड करणारी मानसिकता अशाने टाळता येईल.

In reply to by तुषार काळभोर

कपिलमुनी 27/02/2015 - 16:04
biased निवड करणारी मानसिकता ?? काहीही बोलत आहात ? इथे biased निवड होते असे कशावरून सुचवू पहाता ? मला तरी असे वाटत नाहिये .

In reply to by कपिलमुनी

तुषार काळभोर 27/02/2015 - 17:09
पण "अमुक"चे छायाचित्र आहे, म्हणून ते जास्त आवडले जाऊ शकते. (अगदी अनइंटेन्शनली सुद्धा). (होईलच असे नाही. होऊ शकते.) बायस्ड निवड होते, असे जर ध्वनीत होत असेल तर माफ करा. पण होऊ शकते. कोणते छायाचित्र कोणाचे आहे, हेच जर कळले नाही तर एक प्रकारचा लेव्हल ग्राउंड मिळेल सर्वांना. वाटल्यास मतदान कालावधी पुर्ण झाल्यावर प्रवेशिकांसमवेत स्पर्धकांची नावे जाहीर करता येतील. असो. मी फक्त सुचवले होते. आग्रहसुद्धा केला नव्हता. मिसळपाववर सुचना करण्याला सुद्धा विरोध होऊ शकतो...

जयंत कुलकर्णी 19/02/2015 - 08:56
१) ५ सर्वच बाबींवर हा फोटो उजवा वाटतो......

मृत्युन्जय 19/02/2015 - 10:26
११,२०,२३,२७,३७ आणि ४२ हे सर्वात जास्त आवडले. पण त्यातुनही माझा निर्णय असा: प्रथम क्रमांक - २०.: भयाण शांतता अतिशय उत्तम कैद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक - ११: आल्हाददायक, अंतर्मुख करणारा एकांत फोटोत साठवल्याबद्दल तृतीय क्रमांक - ४२: मुलांशिवाय शाळेत चैतन्य ते काय आणि आरडा ओरडा तो काय? हा नंबर खास कल्पकतेसाठी.

पियुशा 19/02/2015 - 10:45
प्रथम क्रमांक - ५ द्वितीय क्रमांक - ११ तृतीय क्रमांक - ४० उत्तेजनार्थ - २९ सर्वच फोटो अप्रतिम आहेत सर्व स्पर्धकाचे अभिनन्दन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/02/2015 - 11:09
प्रथम. ११ द्वितीय १६ तृतीय १९ उत्तेजनार्थ २० -दिलीप बिरुटे

सुप्रिया 19/02/2015 - 11:10
सर्वच फोटो आवडले. पण फोटो नं. ११ खूप आवडला.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय 19/02/2015 - 11:50
मी फोटोंचा धागा परत बघितला. वेल्लाभट यांचा फोटो तिथे आहे. त्यांनी तो स्पर्धेसाठी म्हणुनच दिला होता. जर त्यांनीच नंतर त्यांची प्रवेशिका मागे घेतली असेल तर ठीक. अन्यथा नजरचुकीने त्यांचा फोटो इथे द्यायचा राहुल गेला असल्यास हा त्यांच्यावर अन्याय होइल. २०-२५ लोकांनी मतदान केले आहे. त्या लोकांना कदाचित वेल्लाभट यांच्या छायाचित्राला मत द्यायची इच्छा असु शकते पण तो फोटो इथे नसल्याने त्यांनी दिले नसेल. त्यामुळे तसे असेल तर हा धागा रद्द करुन परत नव्याने मतदान घ्यावे अशी सूचना करतो.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 19/02/2015 - 12:14
वेल्लाभटांनी त्यांची पहिली प्रवेशिका मागे घेऊन स्पर्धेसाठी २५ क्रमांकाची प्रवेशिका दिलीय.

In reply to by मृत्युन्जय

वेल्लाभट 19/02/2015 - 19:36
'त्या' फोटोवर स्पर्धेच्या धाग्यात आलेले प्रतिसाद आणि वरील चार पाच प्रतिसाद हेच माझं यश समजतो. याच्यापुढे नंबर हुकल्याचं काही नाही. दुसरी प्रवेशिका मीच दिली होती, वेगळा विचार करून. पण हरकत नाही. Sometimes it works sometimes it doesn't. प्रतिसादकांचे मनापासून आभार! पुढच्या स्पर्धेत आणिक तगडी प्रवेशिका देईन. पहिलीच. :)

In reply to by मृत्युन्जय

असंका 20/02/2015 - 13:53
मेल्या म्हशीला मणभर दुध....!! (ओ वेल्लाभट, (आणि मृत्यंजय सेठ ही-) कृ. ह. घ्या. फोटो खरंच बेश्ट होता, आणि अगदी सुरुवातीला आला असल्याने स्पर्धेतल्या इतर फोटोंवरही त्या फोटोची छाया पडली आहे)

नया है वह 19/02/2015 - 12:17
१.५ २.१ ३.३७ ३.४२

चैत्रबन 19/02/2015 - 14:58
१. २० २. १० ३. ४२

सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला) 19/02/2015 - 17:14
पहिला : ११ दुसरा : ३३ तिसरा : ४२

कपिलमुनी 19/02/2015 - 18:10
प्रथम : ११ द्वितीय : ५ त्रुतीय : २७

ज्ञानोबाचे पैजार 20/02/2015 - 11:20
१. ५ २. ५ ३. ५ आणि १५ (माझ्या फोटुला मत न देणार्‍या लोकांची यादी बनवायला घेतली आहे. दंबुकीचीही ऑर्डरही दिली आहे.) पैजारबुवा,

नाखु 20/02/2015 - 12:21
आमची पसंती. क्र१- चित्र क्र.५ क्र.२- चित्र क्र.४२ क.३- चित्र क्र.२० ५- इथे कधी गजबज/पायर्व होता आता शांतता हेच प्राक्तन आहे हे न सांगता कळेल असे! ४२- "शाळा आणि शांत" ! आणि सुट्टी नाहीये हे शालेय सहित्यावरून दिसतय (आत्ता वर्ग भरेल चिमण्यांनी आणि सुरू होईल किलबिलाट) २०- भयकथा वाचायचे (धारप पेश्श्ल) ठिकाण

ब़जरबट्टू 20/02/2015 - 13:47
४२.. इथे शांतता भेटूच शकत नाही...

अनिता ठाकूर 24/02/2015 - 12:43
१)फोटो क्र. ५.....आधीच्या आवाजाची तीव्र आठवण करून देणारी शांतता २)फोटो क्र. ३१....रंगीबेरंगी शांतता ३)फोटो क्र. ४२.... ह्यानंतर कुठल्याहि क्षणी शांतता भंग पावणार आहे ह्याची लख्ख जाणीव करून देणारी शांतता

असंका 26/02/2015 - 17:50
नंबर ५ वाल्या फोटोग्राफरला ट्रॉफी देऊन शेप्रेट बस्वा असा प्रस्ताव होता त्याचं काय झालं? १. ५ २. २० ३. ३२ तांत्रिक्दृष्ट्या ५ आणि ३२ हे एकच फोटो आहेत नाही? फक्त पार्श्वभूमी वेगळी आहे...दोन्हीकडे शांतता ही अघोरी आहे. नकोशी आहे. ज्या कल्पनेने ह्या दोन्ही वास्तू उभ्या केल्या, त्या कल्पनेवर, त्या उद्देशावर काळाने घाला घातला आहे. फक्त भयाण शांतता बाकी ठेवली आहे.

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 18:35
सर्व छायाचित्रकारांचे धन्यवाद, मेजवानीबद्दल! :) माझ्या मते, प्रथम क्र. - ११(एकही तरंग नसलेल्या पाण्यासारखे स्थिर आणि शांत काय बरे असू शकते?) द्वितीय क्र. - ५ (हि वादळानंतरची शांतता म्हणता येईल जिला काही "ग्रे" शेड्स आहेत आणि त्या छायाचित्रकाराने अत्यंत खुबीने टिपल्या आहेत! ) तृतीय क्र. - ४१ (इथे मानसिक शांतता नक्कीच मिळू शकते… ) एक विनंती- छायाचित्रांवर क्लिक केल्यावर ती स्वतंत्रपणे मोठ्या आकारात पाहण्याची सोय करता येऊ शकते का? जेणे करून छायाचित्रांचे बारकावे पाहता येतील…

In reply to by विनोद१८

शब्दबम्बाळ 01/03/2015 - 02:01
पण माझ्या ब्राउसरमध्ये व्ह्यू इमेज ऑप्शन येतच नाहीये, नवीन विंडो मध्ये उघडावं लागत आहे. काही कळेना का ते…