क्रॉसओव्हर आणि परत माघारी-२
त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली.
विज्ञान कथा लिहून लिहून चिंटू तडकला होता. आतापर्यंत जवळ जवळ वीसेक कथा लिहून झाल्या असतील. कुठल्याही प्रस्थापित प्रतिष्ठित मासिकांत त्याची कथा प्रसिद्ध झाली नव्हती. त्याच्या कथावाचनाशिवाय विश्वाचा गाडा अडला नव्हता कि ठोका चुकला नव्हता. कुणालाही चुकल्या सारखे वाटत नव्हते. चिंटूला ह्या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.
मिसळपाव