Skip to main content

पुस्तक खरेदी - काल आणि आज

लेखक rahul ghate यांनी रविवार, 30/07/2023 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व पुस्तक खरेदी - काल आणि आज काल लेकाच्या शाळेत ( इयत्ता २ री ) पालक सभे साठी बोलावले होते, मी फिरस्ती वर असल्या मुळे सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते , वेळ असल्या मुळे ह्या वेळी मी गेलो . शाळेत गेलो तर इतर काही सूचना व मार्गदर्शना नंतर मूळ मुद्दा आला कि पुस्तक विक्रेता शाळेत हजर असून पुस्तके २ दिवसात घेऊन टाका, त्या नंतर पुस्तक विक्रेत्या कडे जाऊन आणावी लागतील.

इलाज नाही

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 29/07/2023 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून...... गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही. उसने घेवून बीज पेरु नकोस काही मातीत खोट आहे त्याला इलाज नाही. सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही. बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही. ------- अभय बापट २९/०७/२०२३
काव्यरस

माझाही एक भयानक अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 29/07/2023 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 29/07/2023 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

निरोपाच्या क्षणी . . …

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 28/07/2023 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
निरोपाच्या क्षणी . . … निरोपाच्या क्षणी अश्रू डोळ्यातील चटका लावून गेले, मन कातर, हळवे हळवे करून गेले. म्हणालो, “वेडे, ह्या जन्मी जरी जमले नाही तरी पुढच्या जन्मी नक्कीच जमवू. हातात हात घालून चालू, एकच कॉफी मागवून, ऊष्टी ऊष्टी पिवू, चंद्राच्या साक्षीने बिलगून वाळूत पाऊल खुणा ऊमटवू, पावसात भिजू, ऊन्हात तापू. मिठीत एकमेकांच्या जगाला विसरू टाकू.

९८ धावांची दमदार खेळी: नांदेडचे आजोबा

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 27/07/2023 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं.

एक गंमतीशीर भयानक अनुभव

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 27/07/2023 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय. b बँगलोरहुन परत येण्यासाठी काल सकाळचे ५.३० चे विमानाचे तिकीट काढले होते. मी आणि बायको , शिवाय बरोबर थोडेफार सामान. तसे सुटसुटीतच होते म्हणा. आदल्या दिवशी मित्राकडे जेवायला गेलो असताना गप्पांमध्ये त्याने आग्रहाने सांगितले की एक तास आधी नक्की चेक इन कराच.

मी वसंतराव - गाण्यापलीकडला अनुभव

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 27/07/2023 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात तेंव्हा गप्पाच मारु या. चित्रपट तसाही चरित्रपट आहे त्यामुळे शेवटी काय होणार आहे हे माहिती असतेच फक्त हा प्रवास कसा उलगडत जातो तेच बघण्यात खरी मजा आहे. ती मजा चित्रपट बघितल्यानंतरच कळते, तेंव्हा चित्रपट नक्की बघा आता टिव्हीवर देखील येतोय.

सांता क्लॉज

लेखक भागो यांनी बुधवार, 26/07/2023 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सांता क्लॉज जानेवारी महिना सुरु होतोय न होतोय बबड्याचे बाबा बबड्याला दमात घ्यायला सुरुवात करतात. “बबड्या, अभ्यास कर. नाहीतर सांता क्लॉज रागावेल.” “बबड्या, काकांकडे चॉकोलेट मागायचे नाही. सांता क्लॉज बघतोय.” “बबड्या, बस झाले तुझे विडीओ गेम. बंद कर आता. नाहीतर...” बबड्या, हे करू नकोस आणि ते करू नकोस. अशाप्रकारे दाढीवाल्या सांता क्लॉजने बबड्याचे बाल्य पार कोमेजून टाकले होते. फुगे, कचकड्याच्या बाहुल्या, गाड्या (खेळण्यातल्या), साप शिडी, बॅटबॉल, नवा व्यापार आणि मागच्या वर्षी रुबिक क्यूब. ह्या असल्या खेळण्यांसाठी वर्षभर चॉकोलेटचा उपास!

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 25/07/2023 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात.