Skip to main content

असंच काहीतरी

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं. काय लिहायचं ते नंतर ठरतं.

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

ती

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 14/10/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
ती धरित्री ती जीवन दायिनी ती शक्ती ती भक्ती ती विद्या ती प्रज्ञा ती अर्धागिनी, ती कन्या ती वीज , ती नीज ती काळजी , ती प्रीत ती प्रेरणा , ती ज्योत ती ममता, मायेच स्त्रोत ती हळवी, अन तरी ती खंबीर हि ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि तीची ओंजळ नेहमी रिक्त, तीचे जगणे कधी मनमुक्त ती पावसची रिमझिम बरसणारी धारा अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली तरी स्वत्व स्वताचे जपलेली ती स्वतंत्र अन ती कणखर ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी स्वतची काळजी स्वताच घेणारी मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा अपेक्षा तर काहीच

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 14/10/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन]. वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे.

बाबा

लेखक मालविका यांनी बुधवार, 14/10/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रिटायर झाले तरी त्यांची सकाळी ६ वाजता उठायची सवय काही बदलली नाही. त्यामुळे नंतर मग सकाळी बाबा आधी उठून चहा करणार हा अलिखित नियमच झाला होता. बाबा आधी एकटेच चहा घ्यायचे. चहा घेता घेता कुत्र्याला बाहेर फिरायला सोडायचे. रामदेव बाबा बघायचे. मग ७ वाजता सगळ्यांना उठवून परत चहाचा दुसरा राउंड. अशी त्यांची सकाळ व्हायची.  शाळेची १० वर्ष चिपळूण शहरात घालवल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी घर बांधलं आणि तिकडे राहायला गेलो. मूळ गाव चिपळूण पासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुढे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिथून चिपळूण पर्यंत ये-जा करावी लागायची. अर्थातच एस.टी. ने.

(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

लेखक दमामि यांनी बुधवार, 14/10/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना खास प्रचेतस साठी, झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!? श्रिखंडाचा क्षणात फडशा ..

भुकेल वासरू

लेखक माहीराज यांनी बुधवार, 14/10/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं.. मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही.. नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही, गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही.. थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं, पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं.. डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, ..
काव्यरस

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

लेखक पाटीलअमित यांनी बुधवार, 14/10/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे . त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्

कळली तर कळवा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 13/10/2015 22:48 या दिवशी प्रकाशित केले.

कळली तर कळवा


दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव