मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

होता एक उस

सोंड्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन झ्या. होता एक उस मला उंडरताना पाहुन पाठीवर फुटनारा डांबरट हुडपणावर माझ्या कचकटून बसनारा होता एक उस बापाच्या हातात उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा होता एक उस उद्धट उफरट बोलल्यावर मला फोडणारा हेरून उघड्या पोट-या अलवार सपकावनरा हवा एक फड उस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणारा होता एक उस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या भावंडांतून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( उसाच्या दांडक्यानी मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )

वाचने 2192 वाचनखूण प्रतिक्रिया 9

जडभरत Wed, 07/15/2015 - 15:10
खूपच भारी!
गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणारा
हे जास्तच भारी. लै डेरिंगबाज!