विश्वास पानिपतच्या लढाईत नेहमीच जातो
"विश्वास पानिपताच्या लढाईत नेहमीच जातो"
अलीकडं गोविंदा , आमचा अनेक दिवसाचा जूना ड्रायव्हर छान छौकी झाला होता.
पूर्वी पांच पैशाला महाग असलेला गोविंदा सध्या कायम खिशात शे पाचशे बाळगून असायचा .
रमी क्लब मध्ये त्याचं नशीब जोरावर आहे,तो सांगायचा . बरं आमच्या कंपनीत व्हावचर इ.लिखापढीला त्याच्या
एव्हडं तत्पर कोण नसेल. तेल पाणी, इंधन , किरकोळ रिपेअरिंग, टोल ,ड्रायव्हरच्या अखत्यारीत
असणार्या सर्व बाबी जिथल्यातिथं.संशयाला एव्हडीसुद्दा जागा नाही.
मिसळपाव