भाडमें जाए दुनियादारी (शतशब्दकथा)
लेखनप्रकार
"७ / मार्च / २०१४ वेळ १० रात्री, क्वालालंपूर,
……
……
……
अश्यारितीने माझ्या चांगल्या नेचर्-चा दुनिया नेहमीच फायदा उठवत आलीये. पण आज, नव्हे आत्तापासूनच ठरवलंय मी, की 'भाडमें जाए दुनियादारी'. " असं आपल्या डायरीमध्ये, फ्लाईटच्या चेकइन लाइनमधे उभ्याउभ्याच नोंदवून, हळव्या वॉंन्गची त्या दिवसाची भडास थंडावली.
"वॉंन्गसर प्लीज, तुमची या फ्लाईटची कन्फर्मसीट तुम्ही स्वेच्छेने त्यागाल काय ? नै काय झालंय की, ओवरबुकिंगमुळे आज थोडा घोळ आहे कॉउंटरवर. तुम्हाला आम्ही चार तासांनंतरच्या फ्लाईटची कन्फर्म सीट फर्स्टक्लास अपग्रेडसकट देवू, शिवाय तोपर्यंत फर्स्टक्लास लाउंजमधे कंप्लीमेंट्री फूड बेवेरेजेसचा आस्वाद घेत, विश्राम करू शकता… " चेकइन कॉउंटरवाल्याने विणवले.
"नाही…. " असे ठणकावून, सोपस्कार आटोपून, वॉंन्ग डीपार्चर गेट सी२४ कडे निघाला, मलेशियन ऐअरलाइन्सच्या MH३७० साठी.
वाचने
5287
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
चार तासांनंतरच्या फ्लाईटची कन्फर्म सीट फर्स्टक्लास अपग्रेडसकट देवू, शिवाय तोपर्यंत फर्स्टक्लास लाउंजमधे कंप्लीमेंट्री फूड बेवेरेजेसचा आस्वाद घेत, विश्राम करू शकता…इतकीही वाईट नव्हती ऑफर!
हम्म्म् ... धिस इज गुड वन.
भारी :)
आजकाल जरा जास्तच होताएत शतशब्दकथा असं नाही का वाटतंय तुम्हाला ?
In reply to आजकाल जरा जास्तच होताएत by उगा काहितरीच
जरा जास्तच होताएत शतशब्दकथाकंपेअर्ड टू व्हॉट ?
In reply to ? by पगला गजोधर
नॉर्मल कथा ! रच्याकने आवडली ही कथा .
In reply to आजकाल जरा जास्तच होताएत by उगा काहितरीच
येउद्याना राव. छोट्या छोट्या कथातून कधी कधी खूप चांगला आशय सांगीतला जातो.
रच्याकने - कथा आवडली..
अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स MH३७० पुढं गायब झाली ना
In reply to अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स by तुडतुडी
तै १०० शब्दांचीच लिमिट हाये. भावनाओन्को समझो :)
In reply to अहो ती मलेशियन ऐअरलाइन्स by तुडतुडी
ऑ, एकूण असा प्रकार आहे होय?
मस्तच पगला गजोधरजी,
आता कळला स्टोरीचा अर्थ!
मस्तं !
खटका दिला तो जर्र्रा उशीरा कळला!
लगे रहो सफाई येतेय या प्रकारात !
अब्दुल
नारायण
डिसूझा
नाखु
कथा लिहिण्याची शैली अतिशय प्रभावी. शेवटचा झटका....खतरनाक.
आईंग...मस्तच =))
जमलीये! मस्त!
मस्त
जबरदस्त....
शेवटी MH ३७० वाचल्यावर
नकळत तोडांतुन "ohh shit" निघाले होते.
छान लिहिलीय
पुढील लिखाणास शुभेच्छा........
मस्त
जबरदस्त....
शेवटी MH ३७० वाचल्यावर
नकळत तोडांतुन "ohh shit" निघाले होते.
छान लिहिलीय
पुढील लिखाणास शुभेच्छा........
अरेरे
कथेतले धक्कातंत्र आवडले.
सही! आणि चायनीज माणसाला मारायची आयडिआ अजूनच!!
कथा आवडली. अर्थ लग्गेच कळला. बिचारा मनुष्य!
छान. आवडली कथा. काही वर्षां पूर्वी ९/११ नंतर अनेक छोटे छोटे आणि वैतागवाणे प्रसंगांमुळे कामावर जायला उशीर झाला आणि म्हणुन च वाचले अशांची उदाहरणं वाचली होती. उलटं उदाहरण पण छान मांडलंत :)
कथा आवडली.
अर्रर्र!
त्यानं ''为了Bhadmen世俗 '' असं लिहीलं असणार !
(सौ. गूगल)
ते तसं बरंच लांबवर घडलं आपल्यापासून, नाही? नै मंजे, कुणाच्या भावना वगैरे गुंतल्या असायचा प्रश्नच नै...!
चार तासांनंतरच्या फ्लाईटची