सात वारांची भारतीय पद्धती
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.)
तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.
आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी
नमस्कार !
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता. त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.
इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास
पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.हर किसमी मै है किस !!!
हर किसमी मै है किस !!!
यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं.
आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे.
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी 'इंपोर्टेड चॉकलेट्स'चं बरंच अप्रूप होतं.
.
.
पीळ
कवितेच्या काही ओळी
जरी सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)
महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा
नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे-
महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा
स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग
मोहीमेची उद्दिष्टे
सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.
मिसळपाव