अधिकार
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते.
पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं.
आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.
मिसळपाव
“ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे”
अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे.
पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा