त्या तरूतळी
लेखनविषय:
अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते
शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो
वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे
अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ
नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!
वाचने
3712
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वा ! मस्त !!!
In reply to वा ! मस्त !!! by अहिरावण
जबरदस्त
खूप आवडली ही कविता.
@अहिरावण
In reply to @अहिरावण by कर्नलतपस्वी
वाह वाह वाह
सुंदर!
वाह!
भावस्पर्शी कविता.
नांदुरकी वृक्ष
अजानवृक्ष
अशोकवनात सीता
खूप सुंदर खूप सुंदर
मुद्दाम log in करून
प्रतिसाद देणार्या