नमस्कार,
दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय.