गुजरात.......८ - रानीकी बाव...
=================================================================
भाग १... भाग २... भाग ३... भाग ४... भाग ५... भाग ६... भाग ७... भाग ८ (रानीकी बाव)...
=================================================================
एकूण प्रवास ३५०० कि. मी.
गाडी: मारुती रिट्झ
तक्रार : शून्य.
गुजरातच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी आम्ही रानीकी बाव या प्रसिद्ध विहीरीला भेट दिली. त्याचे एक छायाचित्र मी मागील लेखाच्या शेवटी टाकले होते तेच आता येथे परत टाकतो.
.......यानंतर आम्हाला पाटणला जगप्रसिद्ध असलेली रानी की बाव पहायला जायचे होते; त्याबद्दल पुढच्या भागात.
पण तेथील एक अप्रतीम शिल्प येथे ट्रेलर म्हणून टाकायला हरकत नाही. हा फोटो मला दोन भागात काढावा लागला कारण मधे खांब येत होते. त्यानंतर लेन्स करेक्शन करुन एकत्र केला आहे.....
ही विहीर सोळंकी घराण्याच्या भीमदेव नावाच्या राजाच्या राणीने बांधली अशी नोंद आहे. हा राजा मुलराजाचा मुलगा. याचा काळ होता १०२२ ते साधारणत: १०६३. म्हणजे ज्या काळात जेरुसलेममधे मुसलमान व ख्रिश्चन क्रुसेडमधे एकामेकांचे गळे घोटत होते तो हा काळ. हे घराणे अनहिलवाड पट्टन या गाचाचे म्हणून ओळखले जायचे. या घराण्याचे राजे बरेच ताकदवान असावेत कारण ज्या प्रकारची शांतता असे बांधकाम करण्यास लागते ती त्यांनी थेथे राबविली होती हे उघड आहे.
सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्यांना थोडीफार माहीत होती.
पाटण शहराची स्थापना झाली ७४६ साली राजपूत राजी वनराजा चावडा याच्या काळात. ही गुजरातची राजधानीही काही काळ होती. काही काळ म्हणजे अंदाजे ६०० वर्षं.
चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२
सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४
वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४
या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.
आत शिरल्याशिरल्या दिसणार्या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
११८० साली महंमद घोरीने पाटणवर आक्रमण केले पण सोळंकींनी ते परतवले पण दुर्दैवाने पुढे त्याच्याच एका सरदाराने म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने १२०० च्या आसपास पाटणचा विध्वंस केला. पुढे दिल्लीच्या सुलतानाचा र्हास झाल्यावर गुजरातचा सुलतान स्वतंत्र झाला व त्याने त्याची राजधानी अहमदाबादला हलविली. साहजिकच त्यामुळे पाटणचे महत्व कमी कमी होत गेले.
काळाच्या ओघात या विहिरीला पाण्याचा पुरवठा करणार्या जमिनीखालील झर्यांनी जमिनीतील हालचालींमुळे त्यांचे पात्र बदलले आणि नंतर ही विहीर संपूर्णपणे गाळाने भरली. त्यामुळेच त्यातील अप्रतीम शिल्पे मुसलमानांच्या आक्रमणापासून वाचली नाहीतर याचेही तुकडे पडले असतेच. जी शिल्पे गाळात गाडली गेल्यामुळे वाचली तीच आता वातावरणाशी संबंध येताच झिजत जाणार हा काळाचा व निसर्गाचा खेळ आहे असेच म्हणावे लागेल. ही विहीर तेथे आहे हे गावकर्यांना माहीत होते कारण वृद्ध माणसे सांगतात की त्यांनी त्या विहीरीतून पाणी काढले होते पण वटवाघळांमुळे त्यांची कधी आत जायची हिंम्मत झाली नसावी. पण त्यांना फक्त त्या विहीरीबद्दल माहिती होती. त्या विहिरीच्या पाण्याकडे उतरण्यासाठी ज्या पायर्या होत्या त्यावर जमलेल्या मातीवर ही मंडळी शेती नांगरत असत.
अप्सरा...
विहिरीची मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.
श्रीविष्णू वराह अवतार...
भूदेवीला एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
यातील मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५० वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण २९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा. विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत पायर्यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या, त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत असे.
एक सुंदर बासरीवादक..
ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
आळस देणार्या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
बहुतेक मदन...हातात उस व दुसर्या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
पायर्यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
कृष्णधवलची मजा काही औरच असते...
आम्ही गेलो तेव्हा विहीर कुठे दिसेना म्हणून आम्ही एका माणसाला विचारले देखील. मी फार पूर्वी येथे आलो होते हे खरे पण आता सर्वच बदललेले दिसले. त्याने बोट दाखविलेल्या दिशेला आम्ही चालू लागलो आणि अचानक थोडी दूर दगडांची एक जमिनीवर आलेली एकफुट उंचीची पायरी दिसली. थोडे पुढे गेल्यावर त्या पायरी पलिकडील दृष्य बघून ताजमहाल जसा एकदम समोर येतो त्याची आठवण झाली. २३ मिटरची खाली उतरण्यास आपल्याला चार मजले सात जिन्यांच्या सहाय्याने उतरावे लागतात. आता फक्त एकाच मजल्यापर्यंत जाता येते. पण पूर्वी तिसर्या मजल्यापर्यंत उतरण्याची परवानगी होती. एका नतद्रष्ट माणसाने एका मुर्तीचा हात तोडल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली. मुर्तींचा दगड तसा ठिसूळ आहे त्यामुळेही असेल कदाचित.
लहानसहान हजारो शिल्पे...
गुढरम्यता....
या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
भिंतींवरचे शिल्पकला...
खांबांवरची नक्षी
खालच्या मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्या उतरुन जातो त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते. सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे. ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
पग घुंघरू...
श्री गणपती...
माझी ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी ही कथा ज्या फोटोवरुन सुचली ते छायाचित्र..
एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची अगणित शिल्पे आहेतच.
किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्यांचे छायाचित्र...
सगळ्यात शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.
दगड निर्जीव असतात असे म्हणणार्यांनी रानी-की-बावच्या पायर्या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील.
जयंत कुलकर्णी
गुजरातची सहल समाप्त.... :-)

वाचने
12794
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
अप्रतिम लेख
लेखमाला पुरी करून चित्ररुपात
अप्रतिम लेखमाला आणि
सुरेख!
अप्रतिम लेख.
अतिसुंदर छायाचित्रे, वर्णन
माझा गणेशा झालाय का?
रानी की वाव दगडात रचलेलं
In reply to रानी की वाव दगडात रचलेलं by अजया
अगदी अगदी.
अप्रतिम शिल्पकलेचं तितकंच
In reply to अप्रतिम शिल्पकलेचं तितकंच by प्यारे१
+१ सहमत
अशीच विहीर अहमदाबाद जवळ अडलज
अप्रतिम
सुरेख सचित्र लेखमाला
खुपच सुंदर फोटो आणि लेखही!
खुपच सुंदर फोटो आणि लेखही!
अप्रतिम लेखमाला आणि चित्रे !
फार देखणे फोटो.सुरेख लेखमाला.
दगड निर्जीव असतात असे
सुरेख छायाचित्रे आणि वर्णन !
जबरदस्त मालिका.
In reply to जबरदस्त मालिका. by खटपट्या
ती बाव मोठी आहे पण एवढी मोठी
सर्वांना आपल्या
अप्रतिम !
वाह जबरदस्त ....
किती सुरेख!
अप्रतिम प्रवास-मालीका.