सहाचा वडा

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
15 Oct 2015 - 11:39 am

प्रेरणा
काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही.
सहाचा वडा गरमागरम असतो!
वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि
आपला हात मस्तसा भाजतो,
चटणी हवी काय म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!

सहाचा वडा झणझणीत असतो!
शरीराचा रोम न् रोम जागा करतो
जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो,
अजून मिरची हवी होती का? म्हणून
खोडीलपणे विचारतो!

सहाचा वडा कॅालेजची आठवण असतो !
मनाचा एकदम रिट्रोस्कोप होतो
पण हातातला ग्लास हातातच राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू सहाचा वडा धूसर होतो
डोळ्यातल्या समुद्रापार दिसेनासा होतो

आरोग्यदायी पाककृतीपाकक्रिया

प्रतिक्रिया

मनीषा's picture

15 Oct 2015 - 3:55 pm | मनीषा

६ चा वडा .... जोशी का दिवाडकरांचा ?

बालगंधर्व मधे ( नाटकाच्या मध्यंतरात) मिळणारा वडा पण मस्तं अस्तो बर्का.

आमच्या कॉलेज कँटीन मधे बनवडा नामक उच्च प्रकार मिळायचा -- दाण्याच्या चटणी बरोबर

बालगंधर्व जवळच्या जोशांचा, ओफिस सुटलं की बर्याचदा घेतो

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:19 pm | प्रचेतस

काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस डोंगरी का कुठेतरी होतं ना म्हणे?

दमामि's picture

15 Oct 2015 - 9:28 pm | दमामि

कधी हो???

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:37 pm | प्रचेतस

हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं लिहिल्याचं स्मरतंय ओ.

दमामि's picture

15 Oct 2015 - 9:38 pm | दमामि

नाव बॅा

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:46 pm | प्रचेतस

देऊ का पुरावा? ;)

दमामि's picture

15 Oct 2015 - 9:48 pm | दमामि

व्यनित द्या पाहू.:)

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:48 pm | प्रचेतस

घाबल्लात वाट्टं ;)

दमामि's picture

15 Oct 2015 - 9:49 pm | दमामि

:):):):):)

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:51 pm | प्रचेतस

=))

किसन शिंदे's picture

15 Oct 2015 - 9:51 pm | किसन शिंदे

अर्रर्रर्रर्र!

असं जाहीर विचारायचं नसतं बे वल्ल्या.

प्राची अश्विनी's picture

15 Oct 2015 - 5:36 pm | प्राची अश्विनी

छान !:)

विवेकपटाईत's picture

15 Oct 2015 - 6:31 pm | विवेकपटाईत

आमच्या उत्तम नगर मध्ये पंखा रोड आहे, बाजूला भला मोठा नाला आहे, चहा आणि वडा उचित मार्गाने त्या नाल्यातच धूसर होणार ...

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 7:45 pm | मांत्रिक

वडा खमंग आहे!!!

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 7:57 pm | मांत्रिक

ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप प्रसिद्ध वडापाव हाॅटेल आहे. कधीतरी वर्षभरापूर्वी गेलतो मित्रांसोबत. कुणाला आठवतंय नाव? भन्नाट होता वडापाव! अगदी भन्नाट!

बोका-ए-आझम's picture

15 Oct 2015 - 8:53 pm | बोका-ए-आझम

बाकी दादरचा श्रीकृष्णचा आणि कीर्ती काॅलेजच्या बाजूला अशोकचा; पार्ल्याला मिठीबाई काॅलेजसमोर विजयचा आणि बोरिवली पश्चिमेस प्लॅटफॉर्म नं.७ च्या जवळचा मंगेशचा - हेव
म्हणजे मुंबईतल्या वड्यांची चारधाम यात्राच आहे.

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 9:08 pm | मांत्रिक

बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच आठवेना! ठाणे पश्चिमच्या स्टेशनसमोरच आहे. अगदी खत्रा वडापाव असतो.
बाकी मिरारोड स्टेशनजवळ कर्जत वडापाव अगदी खतरा मिळतो. अगदी खमंग, तिखट, झणझणीत असतो. २ महिन्यांपूर्विच गेलतो तिथे. जबराट असतो वडापाव एवढेच बोलतो.

किसन शिंदे's picture

15 Oct 2015 - 9:43 pm | किसन शिंदे

कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा???

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 9:50 pm | मांत्रिक

ओ राजे! तुम्ही खाल्लात की नाही? मगच बोला! बाकी मिरारोड स्टेशनचा कर्जत वडापाव विथ मिरची खाऊन बघा! हौस फिटेल पार!

सत्याचे प्रयोग's picture

15 Oct 2015 - 9:07 pm | सत्याचे प्रयोग

जोशी वडे वाले दगडूशेठ समोर 13 रू ला आणि पिंपरी
ला 10 रू. ला विकतात. हा भेदभाव का काय कळत नाही बुवा

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 9:10 pm | मांत्रिक

ओ गांधीबाबा! जाऊ द्या हो! काय अगदी कंजंषपणा करताय गांधीबाबांसारखा! चव चांगली असेल तर खायचा बिनधास्त! लै विचार करायचा नै! गंमतीत बोलतोय! रागवू नका!