अँजेलिना जोलिची 'कुंडली'
स्वामींच्या भेटीची वाट पहाणार्या लोकांच्या नजरा सँडल्सचा टॉक टॉक असा आवाज करत दरबारात प्रवेश करणार्या अँजेलिना जोलिकडे वळल्या. स्वामींची अपॉइंटमेंट घेतल्यामूळे तीला स्वामींच्या भेटीसाठी थेट प्रवेश मिळाला. चेहरा वाचन, हस्तरेषा व कुंडलीवरून अचूक भविष्य सांगण्याच्या कौशल्यामूळे त्यांना देश विदेशात यशस्वी जोतिष विशारद म्हणून ओळखले जाते. स्वामींची किर्ती ऐकून जोली आपले भविष्य जाणण्यासाठी वाराणसीत आली होती.
सँडल्स बाहेर काढून जोलि पांढर्याशुभ्र गादीवर मांडी घालून स्वामींसमोर बसली, भारतीय पद्धतीने जोलिने स्वामींना नमस्कार केल्यावर स्वामींच्या चेहर्यावरील तेजात अजुनच भर पडली.
मिसळपाव
मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे.