दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.
तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ.
मिसळपाव
लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक तसंच शिक्षक या दोघांचा ही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरिक्षण व लेखन अशा विविध माध्यमातून मुलं सतत शिकत असतात. यापै़की 'वाचन' मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा. विविध विषयातील वाचन फक्त आनंदच देत नाही तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो.