एक होती...
क्रींऽऽऽऽऽऽऽ
गजराच्या कर्कश्श आवाजाने विवानला जाग आली. सकाळचे ७ वाजले होते. थोड्याशा अनिच्छेनेच तो आळोखेपिळोखे देत उठला. डोळे जरा कष्टानेच उघडल्यावर त्याने नजर आजूबाजूला फिरवली. ते कळाखाऊ घर बघून त्याला थोडंसं खिन्नच वाटलं. इथे आता सकाळी उठल्यावर चहा घेऊन आपली आई येणार नाही याची जाणीव त्याला अधिकच उदास करुन गेली.
नुकतीच त्याची बदली या ग्रामीण आदिवासी भागात झालेली होती. इकडे येण्यास तसा तो नाराजच होता. परंतु येथे एक दोन वर्षे काम केल्यावर त्याला प्रमोशनसहित मुंबईत काम करण्याची संधी मिळेल, अशी साहेबांनी लालूच दाखवलेली होती. त्याला देखील ही ऑफर आवडलेली होती.
मिसळपाव
पु पुस्तकाचा आणि पुण्याचा माझ्या मते एकच. मराठी पुस्तकांची जास्तीत जास्त प्रकाशने पुण्यात आहेत.
पुण्याचा आणि पुस्तकांचा प्रथम परिचय करून दिला एका पुस्तक वेल्हाळाने. तसे तर वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचून काढायची हौस फार. शालेय पर्वात आसपासच्या सगळ्या लायब्रऱ्या घासून पुसून वाचलेल्या. अगदी चांदोबापासून ते सुशि, बाबा कदम पर्यंत. कॉलेजात गेल्यावर जरा दर्जेदार वाचनाची ओढ निर्माण झाली. पु.ल., गोनीदा, ना.सं.