- डॉ. सुधीर रा. देवरे
गोमांचल, गोपाकापट्टम, गोपकपुरी, गोवापुरी, गोमांतक इत्यादी प्राचीन गोव्याची पूर्वीची नावे आहेत. गोवा हे ऐतिहासिक संचित स्थान म्हणून ओळखले जाते.
उत्तर काळात गोव्याचा उज्वल इतिहास दिसून येतो. इसवी सनच्या पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य होते. नंतर कदंब, महालखेडच्या राष्ट्रकुट राजाचे अधिपत्त्य. चालुक्य व पुढे सिल्हारांचेही राज्य. 14 व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य. नंतर दिल्लीच्या खिलजीची स्वारी. गोव्यावर मुसलमानी अंमल सुरू झाला.