दडपण
"अवो अजौन किती वेळ?"
"अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की"
"माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या"
"अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?"
***
त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला.
"काय झालं? "
"ते ते "
इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?"
खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत.
मिसळपाव