सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६
बर्याच महिन्यांपासून ठरत असलेला सायकल कट्टा आज पुण्यात पार पडला. प्रत्येक वीकांताला कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या राईडमध्ये बिझी असल्याने एकत्र भेटीचा योग येत नव्हता. घमासान चर्चा आणि फोनाफोनी होवून शेवटी पुण्याचा कट्टा शनिवारी सकाळी ठरलाच..
ग्रूपवर ठरल्याप्रमाणे ज्यांना जमणार आहे ते सायकलवीर सायकल चालवत चांदणी चौकात जमणार.. आनंदराव बुलेट आणि कपिलमुनी कारमधून येणार असेही ठरले. पुपेंसाठी (पुण्याचे पेशवे) ठिकाण जवळच असल्याने ते डायरेक्ट मल्टीस्पाईसला भेटणार होते.
मी सकाळी सकाळी स्वच्छ उजेडात बाहेर पडलो आणि अर्धा पाऊण तासात चांदणी चौकात पोहोचलो. तेथे सागर, अभिजीत आणि प्रशांत मालक भेटले.
मिसळपाव
माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.