टीप :
झकेरा तामेर यांच्या He Doesn't Know या कथेचा स्वैर भावानुवाद. शिवकन्या ताई, जयंत काका, बोकाशेट यांनी केलेले अनुवाद वाचून हे एकदा करून पहायचं आहे असा भुंगा मागे लागला. पहिला प्रयत्न म्हणून छोटीशीचं कथा निवडली. वाचल्यावर वाटलं ह्यात काय एवढ! प्रत्यक्षात मात्र फॅ फॅ उडाली. मूळ कथेतला भाव हरवू न देता तिला आपल्या शब्दात मांडण हे अवघड काम आहे हे आता चांगल ठसल आहे मनावर. ही कथासुद्धा मागच्या वर्षी लिहून झाली होती. फर्स्ट ड्राफ्ट शिवकन्याताईने वाचला आणि काही ( खरतर भरपूर ;) ) बदल सूचवले. त्यातले सर्वच बदल मला करता आलेत की नाही काय माहीत! नंतर अनेक कारणांनी इथे कथा प्रकाशित करणे राहून गेले. आता प्रकाशित करायचे धाडस तर करतीये पण हेही परफेक्ट नाही हे माहितीये.
शिवकन्याताईला अनेक धन्यवाद मार्गदर्शनासाठी :)
माहीत नाही!
"किती वेळ रे साल्या? कधीची तुझी वाट बघतोय? मागच्यावेळ सारखा डिच्चु देऊ नको हरामखोर"
"बॉस बसलाय समोर नाहीतर तुझी भाषा मला पण येते. निघतोय. पोचतोच."
शंतनूने फोन कट करून खिशात टाकला आणि बॅग गळ्यात अडकवून ऑफिसच्या बाहेर पडला.
आज खूप वर्षांनी शंतनू त्याच्या मित्रांना त्यांच्या नेहमीच्या बारमधे भेटणार होता. बॉसने शेवटच्या क्षणी ठरवलेल्या मिटींगने शंतनूचा प्लॅन फिसकटला. शंतनूला तिथं पोचायला चांगला तासभर तरी उशीर झाला. तो येताच मित्रांनी एकच कल्ला केला.
"काय रे साल्यानो माझ्याशिवाय सुरू झाला ना?" टेबलवर पसरलेल्या रिकाम्या बाटल्या बघत शंतनू म्हणाला.
"चल रे लेट लतीफ, कशाला कटकट करतो. आता आलायस ना? बस आणि हो सुरू! आमच्यासारखा शुद्धीत आलास की मग बोलू!" सुस्तावलेल्या आवाजात त्याचे मित्र बोलले.
त्यांच्या बोलण्याला नुसती मान डोलावुन शंतनू खाली बसला. शेवटी इथं यायचं त्याचं कारणही तेच होतं, अगदी झिंगुन जाइपर्यंत दारू प्यायची! कसलीचं शुद्ध नाही राहिली पाहिजे! स्वतःचीपण! खाली बसत शंतनूने बार टेंडरला ऑर्डर दिली. व्हिस्की नीट, नो आइस नो वॉटर! एकामागे एक शंतनू व्हिस्कीचे पेले रिचवू लागला. त्याचा गेलेला वेळ आणि मित्रांशी शिल्लक राहिलेल्या गप्पा त्याला लवकरात लवकर भरून काढायच्या होत्या.
त्याच्या मित्रांइतकीच खरं तर थोडी जास्तच शुद्ध हरपल्यानंतर शेवटी शंतनूने त्याच्या पाकिटातून एक फोटो काढून टेबलवर ठेवला. पारिजातकाच्या फुलासारख्या नाजुक एका मुलीचा फोटो पाहून मित्र प्रश्नार्थक चेहऱ्याने शंतनूकडे पाहू लागले. त्यावर शपथ घेत शंतनू म्हणाला,
"खरंच माहीत नाही ही मुलगी कोण आहे! कधीच भेटलो नाहीये तिला! कुणी दिला हा फोटो? मला नाही माहित. सारा होत तीच नाव, पण ते मला नाही माहित. फुलाच्या पाकळ्यासारखी नितळ मऊशार होती तिची त्वचा पण हे मला मुळीच माहित नाही! तिचे काजळ घातलेले मोठे मोठे डोळे कसे काय मला माहित असतील? चाफ्याच्या कळीसारखं सरळ नाक तेही मला नाही माहीत. मी इकडे या टोकाला आणि ती तिकडे. किती चक्कर मारले तिच्या छोट्याशा दुकानाचे, ती तिथे काम करायची हे काय मला माहित नव्हत. जवळच्याच बिल्डींगमध्ये राहायची. त्या छोट्याशा घरातली तिची बेडरूम मला माहित नाही आणि सिल्कचे नाईटड्रेस आवडायचे तिला पण ते मला नाही माहित. आवडता रंग? निळा रंग आवडायचा तिला पण ते मला नाही माहित. मला खरंच नाही माहिती अंघोळ करून आली की तिच्या केसांत अडकलेले पाण्याचे थेंब मोत्यासारखे दिसायचे ते. नटून थटून बाहेर पडताना दार बंद करेपर्यंत आरशाच्या मागेपुढे करायची तिची सवय मला कशी माहित असेल? समुद्राच्या पाण्यात सूर्य विरघळून जाईपर्यंत बघायला तिला आवडायचं, लाटा तिच्या पायाला स्पर्श करून गेल्या की तिला गुदगुल्या व्हायच्या का? माहित नाही. तिला बाहेर खायला आवडायचं नाही हेपण माहित नाही आणि तिला छान स्वैपाक करता येतो हेही मला माहित नाही. तिला खळखळून हसायला आवडतं, मनीमाउशी खेळायला आवडतं, रात्री हातात हात गुंफुन चालायला आवडतं, आणि तिच्या पोटातल्या छोट्याशा बाळाने जगात यायच्या आधीच आत्महत्या केली पण यातलं काही काही मला माहिती नाही. एक चिट्ठी दिली तिनी फक्त! अजिबात लिहिता येत नाही तिला. असंख्य चुका होत्या त्यात, पण तक्रारी नव्हत्या. कुणीतरी काळजाला हात घालाव असलं काहीतरी लिहून ठेवलंल. तेव्हापासून ती मला का दूर करू लागली हे मला नाही माहिती. तसंही ना मी तिला ओळखतो ना ती मला आणि ती मला ओळखत असती तर मला कळलं असतं ना की ती मला ओळखते. पण मी तर तिला ओळखतही नाही!"
सलग तिसर्यांदा जेव्हा शंतनू "पण मी तर तिला ओळखतही नाही" म्हणाला तेव्हा टेबलजवळ उभ्या वेटरने त्याला खायला काही हवं आहे का विचारलं. शंतनू म्हणाला जे काय माझे मित्र ऑर्डर करतील तेच! त्याच उत्तर ऐकून वेटर हसला. तेव्हा शंतनूच्या लक्षात आलं तिथं त्याला एकट्यालाच ठेवून त्याचे मित्र कधीच निघून गेले होते.
टेबलवरचा तो त्याला माहीत नसलेल्या मुलीचा फोटो शंतनूने चूरगळला. त्याला नाही माहीत तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं तिच्यावर. त्याला कधी कळलं असतं तरी तो हेच म्हणाला असता माहीत नाही!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3395
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त...
समजली की समजल्यासारखी वाटली
:(
तुम्ही ही कथा का लिहिली ..
चांगला प्रयत्न....पण मी वाचला की नाही माहित नाही....
माहित नाही!
In reply to चांगला प्रयत्न....पण मी वाचला की नाही माहित नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
छान
माहीत नाही...
आपल्याला
खिक्क मूळ कथेची लिंक माहीत
सर्वांना धन्यवाद. :)
डिनायल मोड मधल्या व्यक्तीची
डीनायल मोड समजून वाचलीत, हे
In reply to डिनायल मोड मधल्या व्यक्तीची by कानडाऊ योगेशु
अरे वा! आज मैं उपर ;)
In reply to डीनायल मोड समजून वाचलीत, हे by शिव कन्या
डीनायल मोड समजून वाचलीत, हे
डीनायल मोड समजून वाचलीत, हे उत्तम. त्याशिवाय ही कथा उमजत नाही.च्यायला, आत्ता समजली. अगोदर गोंधळ उडाला होता. बाकी अनुवादाचं माहीत नाही पण"खरंच माहीत नाही ही मुलगी कोण आहे! कधीच भेटलो नाहीये तिला! कुणी दिला हा फोटो? मला नाही माहित. सारा होत तीच नाव, पण ते मला नाही माहित. फुलाच्या पाकळ्यासारखी नितळ मऊशार होती तिची त्वचा पण हे मला मुळीच माहित नाही! तिचे काजळ घातलेले मोठे मोठे डोळे कसे काय मला माहित असतील? चाफ्याच्या कळीसारखं सरळ नाक तेही मला नाही माहीत. मी इकडे या टोकाला आणि ती तिकडे. किती चक्कर मारले तिच्या छोट्याशा दुकानाचे, ती तिथे काम करायची हे काय मला माहित नव्हत. जवळच्याच बिल्डींगमध्ये राहायची. त्या छोट्याशा घरातली तिची बेडरूम मला माहित नाही आणि सिल्कचे नाईटड्रेस आवडायचे तिला पण ते मला नाही माहित. आवडता रंग? निळा रंग आवडायचा तिला पण ते मला नाही माहित. मला खरंच नाही माहिती अंघोळ करून आली की तिच्या केसांत अडकलेले पाण्याचे थेंब मोत्यासारखे दिसायचे ते. नटून थटून बाहेर पडताना दार बंद करेपर्यंत आरशाच्या मागेपुढे करायची तिची सवय मला कशी माहित असेल? समुद्राच्या पाण्यात सूर्य विरघळून जाईपर्यंत बघायला तिला आवडायचं, लाटा तिच्या पायाला स्पर्श करून गेल्या की तिला गुदगुल्या व्हायच्या का? माहित नाही. तिला बाहेर खायला आवडायचं नाही हेपण माहित नाही आणि तिला छान स्वैपाक करता येतो हेही मला माहित नाही. तिला खळखळून हसायला आवडतं, मनीमाउशी खेळायला आवडतं, रात्री हातात हात गुंफुन चालायला आवडतं, आणि तिच्या पोटातल्या छोट्याशा बाळाने जगात यायच्या आधीच आत्महत्या केली पण यातलं काही काही मला माहिती नाही. एक चिट्ठी दिली तिनी फक्त! अजिबात लिहिता येत नाही तिला. असंख्य चुका होत्या त्यात, पण तक्रारी नव्हत्या. कुणीतरी काळजाला हात घालाव असलं काहीतरी लिहून ठेवलंल. तेव्हापासून ती मला का दूर करू लागली हे मला नाही माहिती. तसंही ना मी तिला ओळखतो ना ती मला आणि ती मला ओळखत असती तर मला कळलं असतं ना की ती मला ओळखते. पण मी तर तिला ओळखतही नाही!"हा भाग मात्र मास्टरपीस वाटला. अगदीच काव्यमय, बेभान....!ठान्कु बरं का :)
In reply to डीनायल मोड समजून वाचलीत, हे by जव्हेरगंज
आयोव.....
In reply to ठान्कु बरं का :) by रातराणी
मस्तच रारा!
धन्यवाद बोका ए आझम!
In reply to मस्तच रारा! by बोका-ए-आझम