झिंग झिंग झिंगाट....सैराट ....!!!
पहिल्याच दिवशी सैराट पाहिला, त्यामुळे काहीही माहित नसल्याने भयंकर परिणाम झाला.अक्षरशः शेवट पाहिल्यावर तर एकदम गार पडलो. बराच वेळ कुणाशी बोललोच नाही. परश्या , अर्ची, लंगड्या अन साल्या एकदमच भन्नाट. त्याबद्दल काही लिहित नाही कारण मिपा वर त्याबद्दल पाऊस पडला आहे , अन मला भर घालण्यासारखे काहीच नाही. असो.
खरे तर मला पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्या पात्रांचे आणि खुद्द नागराज चे मनोगत जाणून घ्यायचे होते . कारण सोशल मेडिया वर चाललेला धिंगाणा. आपल्याकडे एक गोष्ट फार आहे ती म्हणजे कोणी काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न केला अन त्यात तो यशस्वी झाला तर त्याचा इतका खल केला जातो कि त्या मुळे गोष्टीची मजा तर निघून जातेच पण काहीही असंबंध , अतार्किक निरीक्षण आणि अनुमाने निघू लागतात. अर्थात हे हानिकारक असतेच.
ए बी पी वाल्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. सगळ्या सैराट टीम चा कट्टा च त्यांनी आयोजित केला अन त्यामुले त्या टीम चे खरे मनोगत समजले. त्यासाठीच हा प्रपंच. पहिली वेळ आहे एवढे लिहितोय सांभाळून घ्या .(आतापर्यंत फक्त प्रतीक्रीयांबाबातच मर्यादित होतो..असो)
सगळी पोर परश्या,अर्ची,प्रदीप आणि सल्या हि नवोदित च .काहीही आगापिछा नाही.पण नागराज ने त्यांच्याकडून जे पाहिजे ते काढून घेतले. या बद्दल नागराज ला १० पैकी १० मार्क. कट्ट्यात तर विचारलेले काही प्रश्नही त्यांना समजत नव्हते . इतकी ती नवखी.पहिल्याच फटक्यात त्यांना महाप्रचंड यश भेटले. पण ती हुरळून गेली नाही कारण त्यांचा गुरु नागराज . पुढे चित्रपटातच काम करायचेच असे हि नाही कारण ती शक्यता अत्यंत कमी . पण पोरही भारी , त्यांनाही ते ठाऊक आहे. परत याला कारणीभूत नागराज. त्याने ती फन्तूस हवा डोक्यात जाऊन द्यायचे प्रकर्षाने टाळलेले दिसत होते. सगळे संभाषण एकदम अनौपचारिक आणि वास्तवात होते . असो , पोरांबद्दल एव्हढेच.
आता नागराज बद्दल. स्वतःच्या कामाबद्दल त्याला जबर आत्मविश्वास आहेच पण तो सडेतोडपने मतही मांडायला कचरत नाही. अभिनयाबद्दल त्याचे स्पष्ट मत आहे कि हे सर्व दिग्दर्शकाचे कसब आहे . त्याचीच स्पष्टता नसेल तर अभिनय हि तसाच.आणि हे त्या एकदम पाटी कोरी असणार्या पोरांकडे पाहिल्यावर कळतच.त्याच्या विचारात सुस्पष्टता आहे . भले मांडायला त्याला वेळ लागतो.
पण तो दुटप्पी वाटत नाही , माझा पिक्चर एक कलाकृती म्हणून पहा म्हणतो अन ते खरेच आहे.
आपणच भंकस निर्माण करतो. आता हा नागराज ज्या पार्श्वभूमीतून आला आहे त्याचा थोडा फार तरी प्रभाव असणारच त्याच्या गोष्टींवर , ते काही गैर नाही . पण त्यातून आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढायचे अन त्याच्या नावावर खपवायचे . बाष्कळ पणा आहे हा. मग त्याने दाखवलेल्या जातीभेद बद्दल टिप्पणी , मग मुद्दामहूनच त्याने ; पोरगी मोठ्या घरातील आणि पोरगा गरीब आणि खालच्या जातीचा दाखवला वगैरे ..अरे पण एक निखळ कलाकृती म्हणून नाही आनंद घेऊ शकत ? खुद्द नागराज च्या देखील एव्हढे काही मनात नसेल .
नवा माणूस आहे , काहीतरी वेगळे करतो आहे अन चांगले भन्नाट करतो आहे .करून द्या त्याला. कश्याला त्याला या फालतू जंजाळात अडकवता ? मान्य अगदी दारिद्र्यातून आला , वडार जातीतून आला मग काय ? आताचे ग्लोबल जग आहे . त्यात कला हि कुणाची मक्तेदारी नाही. ज्याला त्याची थीम सापडली तो मनसोक्त संचार करतो त्यात. नागराज ला नेमकी मेख सापडली आहे , फुकट नाही दुसराही सिनेमा हिट.
सोशल मेडिया वर जे धुणे धुतले जाते आहे त्याचे त्याला घेणेही नसेल कदाचित , पण जो तो त्याला इकडे तिकडे ओढायला लागला आहे. पण या बाबतीतही नागराज तटस्थ आहे . तो म्हणतो मी जात पात मनात नाही यातच सगळ आलं.पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले थोडीच ऐकतात.उलट अश्या भंपक वागण्याने त्या नागराज चीच गोची व्हायची .असो.
पण एक मात्र खरे भरपूर चित्र विचित्र परिस्थितून आला पुढे हा नागराज. त्यामुळे त्याचे अनुभव विश्व संपन्न आहे. त्याचे कौतुक झालेच पाहिजे.त्याला संकुचित करू नये. परंतु आपल्याकडे असे आहे कि एखाद्याने काही विशेष केले कि एव्हढे वारेमाप कौतुक होते कि जर उत्सव मूर्ती भंपक असला तर झालेच त्याचे फुगून वाटोळे. परंतु नागराज समतोल वाटतो . अन त्याने असायलाच हवे.
आता त्याच्या चित्रपटाबद्दल. स्थानिक भाषा,जशी न तशी , थोडाही बडेजावपणा नाही कि उगीचच ताणाल्यासारखी नाही म्हणून तडक मनाला भिडते. एकदम नैसर्गिक अभिनय. चपखल पात्र. आजूबाजूला घडल्यासारखी वेगवान कथा अन अतिशय अनपेक्षित शेवट त्यामुळे चित्रपट विलक्षण पकड घेतो. चित्रपटाचा शेवट कसा करावा हि एक अतिशय कठीण कला आहे , बर्याच जणांना जमत नाही . नागराज ला ती साधलेली आहे . अगदी फ्यान ड्री तही सुन्न करणारा शेवट होता .
ठीक आहे आता नागराज ने जरा दुसरीकडे पाहावे , सामाजिक चित्रपट झाले आता जरा विषय बदलावा. कारण ते विश्व अफाट आहे अन त्याची त्यावर हुकुमत आहे. काय सांगावे नागराज एकदम चकचकीत चित्रपट काढून अच्छर्याचा सुखद झटका सुद्धा देईन अन त्याने द्यावा.
वर्गीकरण
सैराट पाहिला नाही, गेले
पटले ,काही फड्तुस टिनपॉट
यु ट्युबबर सैराट मधले काही
In reply to यु ट्युबबर सैराट मधले काही by कानडाऊ योगेशु
पहील्या सीनमध्ये पोर व मग
In reply to यु ट्युबबर सैराट मधले काही by कानडाऊ योगेशु
वाचतोय...
आजच पाहीला
अरे वाह !
पोर विहीरीत उड्या मारतानाच्या
In reply to पोर विहीरीत उड्या मारतानाच्या by कानडाऊ योगेशु
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काश्मिरकडे नाही सर ह्यावेळेला
In reply to काश्मिरकडे नाही सर ह्यावेळेला by कानडाऊ योगेशु
हो हो
In reply to हो हो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सल्य्या कुर्डुवाडीत, प्रदीपचा
In reply to पोर विहीरीत उड्या मारतानाच्या by कानडाऊ योगेशु
जानवे धारण करणारे तथाकथित
In reply to जानवे धारण करणारे तथाकथित by काळा पहाड
डाऊब्ट हय!
In reply to जानवे धारण करणारे तथाकथित by काळा पहाड
राहतात, जानवे घालत नाहीत :)
In reply to राहतात, जानवे घालत नाहीत :) by इष्टुर फाकडा
तुम्हाला: का.यो. यांना !
सैराटवर बारावा धागा आला असला
सर तुमचा पुर्ण लेख
In reply to सर तुमचा पुर्ण लेख by मारवा
ही विसंगती
In reply to ही विसंगती by भम्पक
सहमत