Skip to main content

‘तुला’

लेखक शंतनु _०३१ यांनी शुक्रवार, 26/08/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
‘तुला’ तुला मानण्यात काहीच अर्थ नाही, तू आहेस ही जाणिव मुळात नकोशी आहे. इथे तू हवाच कुणाला आहे. तुझ्या आदर्शांचा न्याय जगात सर्वत्र लावता येत नाही. तूला स्मरायचे ते फक्त मन:शांती साठी ? मन:शांती ती फक्त योग्य निर्णयासाठी. आणि योग्य निर्णय तो फक्त आपल्या फायद्यासाठी ? पिडीत, उपेक्षित, अन्याय सहन करणारे अश्या ढाली घेवून जगणार्यां, समानतेची मागणी करणार्यांना तुझ्यावरच विश्वास नाही. तुझ्या तत्वांचे उपदेश देणार्यांमध्ये ‘मी’ पणाचा वास येतो. असे दोन्हीही सतत तुलना करत असतात. तुझ्या चांगल्या वाईटची. आस्तिक नास्तिकाच्या विचारांची. यश अपयश – चढ उतार सगळ्याचं पाहावे लागतात.

मी पा सदस्यांची मदत अथवा मत हवे आहे....

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 26/08/2016 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... खरे तर खूप कंटाळा आला आहे या नेहेमीच्या रुटीनचा. अस्मादिक स्थापत्य अभियंता असल्याने तरी बरे आहे दरवेळी नवीन आव्हाने येतात अन स्वानंद भेटतो. परंतु आता मात्र वैताग आला आहे . असो. सध्या अँप ची चलती आहे. आमच्याही मनात असाच एक विचार आहे . सर्व बांधकाम संबंधित सेवा ( छोट्या स्केल वर.,म्हणजे जशी घर टू घर डिलिव्हरी ) एका छत्राखाली आणण्याचा मानस आहे. मग त्यात प्लम्बिंग, इलेक्टरीफिकेशन, फ्लोरिंग, सुतारकाम , रंगकाम , वॉटर प्रूफिंग , फर्निचर , किरकोळ बांधकाम , छोटे बदल , तोडफोड इ . तसेच इतर सेवा जसे व्हाल्यू एशन, प्लॅनिंग , देखरेख इ . समाविष्ट असेल .

आमचे समूहगान....(?)...

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 26/08/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुलाला घेऊन शाळेत गेलो होतो. आज सुट्टी होती परंतु त्याची शाळेत समूहगीताची स्पर्धा होती . त्यांच्या शाळेची 10-12 मुले आलेली होती. अन स्पर्धा रामकृष्ण मठात होती. त्यांचा सर्वांचा व्यवस्थित गणवेश पाहून आणि तयारी पाहून मला माझ्या समूहगीताच्या स्पर्धेची आठवण आली. 1985-86 सालची गोष्ट असेल. त्यावेळी मी बहुधा 6 वीत होतो. आणि सांस्कृतिक स्पर्धेत तेव्हा मी नेहमी भाग घेत असे. कोणताही कार्यक्रम असो माझे गाणे अथवा भाषण ठरलेले असायचे. अश्याच एका तालुका लेव्हल स्पर्धेसाठी आमचा एक गट बनवला होता. माझ्यासारखेच वयक्तिक गाणी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरांनी गट बनविला होता. जोर्वेकर सर होते .

"तडफड" की "तोडफोड"

लेखक विशुमित यांनी शुक्रवार, 26/08/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून मी लिहलं "त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!! शब्दांची तोडफोड केली पण काळजाची तडफड झाली भावनांचं झाड झडलं थोडक्यात लिहिण्याच्या नादात मन पार कोरडं पडलं मी लिहलं माझ्या परीने माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!! ==>> विशुमीत

न्यु यॉर्क "सफर"!

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 26/08/2016 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;) अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ वीट पहिली! कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!! पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो.

अमेरिकेत मी काय वाचतोय ? भाग २ रा

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शुक्रवार, 26/08/2016 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
असाही एक अजब गजब दिन ! ! नुकताच भारतात व येथे अमेरिकेत सुद्धा, सर्वच भारतीयांनी १५ ऑगस्ट २०१६ ला " भारतीय स्वातंत्र्य दिन " मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.त्याचे ' चलचित्रण ' ( म्हणजे व्हिडिओ ) मी सुद्धा, येथे अमेरिकेत बसल्या बसल्या, दुरून दर्शन करून ( दूरदर्शन संचावर ) अनुभवले. आणि सहज विचार केला कि आपण वर्षभरात किती तरी दिन साजरे करीत असतो.

कोण?

लेखक मिसळपाव यांनी शुक्रवार, 26/08/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे? तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे? ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
काव्यरस

अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिसलास तू, उमले यौवन हसलास तू, लाजले नयन. आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे गंध पसरवे, यौवन वारे. रोम रोमात रे फुलतो फुलोरा देहात उसळे, बेभान वारा जाळते तन, धुंद चांदणे, घे मिठीत, हेच मागणे, अधरा वरती तू लिहिले ते गुपित आपले अधरी जपते मिठीत तुझ्या हि तनू विरघळते श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते, देहास आलिंगता ,मी एकरूप होते, अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

रंजीश हि सही

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 25/08/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

एक संघ मैदानातला - भाग २०

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 25/08/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैयक्तिक कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- योग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. उद्यासाठीचा सॉलिड टॉपिक तिला मिळाला होता. तुप्याने तिला झापडून शांत केलं. ती गप्प बसणार नाही हे आम्हाला माहित होत पण तिला जे हवं ते आम्ही तिला आत्ता करू देणार नव्हतो. सगळीकडे प्रचंड शांतता होती. हवेत उकाडा असल्यामुळे आत जावेसेही वाटत नव्हते पण म्हणून रात्र बाहेर काढणे पण योग्य नव्हते. अजून थोडा वेळ बाहेर काढून आम्ही नाइलाजले आत जाऊन झोपलो. मनावर आलेल्या ताणाने म्हणा किंवा त्या रागाने म्हणा नीट झोप काही लागली नाही.