Skip to main content

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 25/08/2016 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************************** भाग १ - कुंभार्ली घाट ***************************** चिपळूणमध्ये सकाळी उठलो तेच देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजाने. आंम्ही मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या शेजारीच एक शाळा + कॉलेज होते त्यामुळे सकाळी अलार्मची गरज भासलीच नाही. गाणी ऐकत ऐकत आवरले.. सहज म्हणून टीव्ही लावला तर बोल्टची १०० मीटरची रेस थोड्या वेळात सुरू होणार होती. मग त्या रेसमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले.. बोल्टचे सुवर्णपदक बघून आंम्ही हॉटेलच्या डायनींग हॉलकडे मोर्चा वळवला आणि पोहे चहा अशी दिवसाची सुरूवात झाली. या हॉटेलमध्ये बहुदा नाश्ता लिमीटेड होता.

स़ादत हसन मन्टो आदरांजली - २ ‘‘खोल दो !’’

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’ - मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला. स़ादत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन.

पावसाळी कोकणातली सायकल सफर भाग:१

लेखक अमित M यांनी गुरुवार, 25/08/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------- मोदक उर्फ मनोजने घाटवाटांवरच्या सायकलिंगचा पहिला भाग टाकला आहेच ! त्याच्या पूर्वपरवानगीने आमच्या सायकलिंग चा पहिला भाग माझ्या शब्दात --------------------------------------------------------------------------------- अशीच एक संध्याकाळ…. असेच तीन मित्र… अन रंगलेली बैठक .... “ चला आता लै झालं ! हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही.” “एखादी पावसाळी राईड होऊनच जाऊद्या !” तसेही बरेच दिवस झाले होते उन्हाळ्यामुळे आणि कंटाळ्यामुळे कुठे जाणं झालं नव्हतं.

दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/08/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मामाकडे आजोळी बांध-तिवरे येथे जायचो तेव्हा कुठल्या का कारणासाठी होईना आमच्या मामाची दापोलीची २ दिवसा आड एक फेरी ठरलेली असायची. तेव्हा मामा आईला "मी कापात जाऊन येतोय गं काय आणायचंय का? असे विचारत असे तेव्हा कापात म्हणजे काय हे कळायचे नाही. पुढे कळलं की कापात म्हणजे कॅम्पचा अपभ्रंश आहे. या गाववाल्यांनी खर तर कॅम्पचा उल्लेख कापात असा केला आहे. इंग्रजांनी दापोलीचे महत्व ओळखले होते आणि त्यांच्या काळात एक कॅम्प दापोली येथे होता. इंग्रजांनी बांधलेले आल्फ्रेड गॅडनी हायस्कुल आजही तिथल्या मुलांच्या शिक्षणाची आस पुरी करत आहे.

गोविंदा!...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/08/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!!

धाक... दहशत

लेखक मन यांनी गुरुवार, 25/08/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते. उरुस , जुलूसही मागे नसतातच. त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं. डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ; आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो. बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.

अमेरिकेत मी काय वाचतोय ?

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी गुरुवार, 25/08/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी पुन्हा एकदा अमेरिकेत आलो असुन,माझे वाचन काय सुरु आहे अशी विचारणा,भारतातील सूनबाईने (सौ सुजाता ने)केली आहे,त्याचे हे उत्तर. सर्वात प्रथम आत्ता दोन पुस्तकांचे वाचन सुरु आहे,१) A-G Man's Life.....by मार्क फेल्ट व २) Inside the White House( The hidden lives of the modern Presidents and the secrets of the World's most powerful institution. by Ronald Kessler.( पत्रकार ) येथील (माहवाह) लायब्ररीचे एक बरे आहे कि पुस्तक देतांनाच,परतीची तारीख लांबची देतात.पुस्तके आणली १८/८ ला, आणि परत करायची आहेत ७/९ला. फोनवर सुद्धा दोन वेळा मुदत वाढविता येते.

इंग्लंड भटकंती भाग ४ - लंडन

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 25/08/2016 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड लंडन ... थेम्स नदीच्या काठावर वसलेले जगातील एक फार मोठे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र. आतापर्यंत झालेल्या दोन्ही महायुद्धांमध्ये जर्मनीने लंडनवर प्रचंड बॉम्बफेक करून शहर बऱ्यापैकी उद्ध्वस्त केले होते. तरी देखील त्यातून फिनिक्स प्रमाणे भरारी घेत हे दिमाखदार सुंदर शहर जगभरातील लोकांना त्याच्याकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी झालेले आहे. लंडनमध्ये तुम्हाला विनासायास फिरायचे असेल तर फक्त 4 गोष्टींची गरज आहे 1) 'ऑयस्टर कार्ड' - जे लंडनची ट्यूब ट्रेन, बस सगळीकडे चालते.

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू

लेखक मोदक यांनी गुरुवार, 25/08/2016 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
************************ भाग १ - तयारी भाग २ - पुणे ते रोहतक भाग ३ - पानिपत भाग ४ - चंदिगड आणि मनाली भाग ५ - रोहतांग आणि केलाँग ************************ गॅरेजवाल्याने नीट निरीक्षण केले आणि बोलता झाला... "आपकी तो टंकी फट गई है..!!" मी : ऑ..??????? आता काय करायचे..?? यावर तोच म्हणाला..

लसूण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 24/08/2016 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपुन पद्या. जग आपल्याला पद्या म्हणतं. का म्हणतं? WE DONT NO. आपल्याला ल्ह्यायला भौतेक जमणार नाय. आपुन निसता हिंडतो. सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो. आपुन सायबाचे फेवरेट. आपल्याशिवाय लाईन चालणारंच नाय. आपल्याला मशनीतलं सगळं जमतं. नुसतं चालवतंच नाय. नट बोल्ट खोलून मेंटेनस बी ठेवतो. दुपारी आपण कन्वेयरच्या साईडला झोपतो. सायेब काय बोलत नाय. आपण सायबाचे फेवरेट. चार दिवस सुट्टी मारायची तर आपुन आठ दिवस मारतो. तवा सायेब बोंबलतं. आपुन ऐकूण घेतो. पण आपण सायबाचे फेवरेटंच. आपण गँगचे लीडर. पोरांना काय दुखलं खुपलं, आपण निस्तारतो. सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली.