माझ्या मनाच्या कपाटात टांगवले आहेत अनेक ह्यांगर्स...
भावना टांगवून ठेवल्यात मी त्यावर..
ते बघ गुलाबी रंगाच बायकोवरच प्रेम,
हल्ली सणासुदीलाच काढतो मी बाहेर..
तो पहा माझा रागाचा ब्लेझर ..
त्याच्या आतमध्ये लटकलेला अहंकाराचा शर्ट नि नेकटाय ..
सहज कळू देत नाही मी कुणाला मी सुद्धा वापरतो ब्लेझर...
समोरची माणस बघून ...
तो द्वेषाचा घामट ,कुबट सदरा..
सभ्यपणाच सेंट मारून वापरावा लागतो .
ते वेगवेगळ्या रंगाचे २ ह्यांगर्स दिसताहेत आहेत ना? .
खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ...
सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ...
कुणालाही नकळत..
या मनाच्या कपाटाला ...
लावावी लागते वर्तमानाची घट्ट कडी...
तेव्हाच मी जगू शकतो सभ्य माणूस म्हणून...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3573
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुड़
ओह्ह, जबरदस्तच की.
सुपर्ब!
रोचक आहे !
अप्रतिम !
याड लावणारं
आवडली
कविता आवडली.
आवडली...
जबराट!
छान कल्पना...! औरांदो..
अफलातून जमली आहे
लिहित रहा. हे भन्नाट जमलंय..
भारी!
मस्त,
छान कल्पना... आवडलि...
fantastic.... खूप आवडली
कडक!
खरे तर त्यावर आहेत कामभावनेची