Skip to main content

माझ्या कवितेची शाई

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/03/2017 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेची शाई आहे अजब मिश्रण भस्म अधुऱ्या स्वप्नांचे त्यात अश्रुंचे शिंपण कधी माझ्या कवितेचा शब्द निनादे आभाळी कधी धरती विंधतो कधी गुंजतो पाताळी कवितेची ओळ माझ्या कधी फुलांनी वाकते कधी बोलता बोलता गहनाशी झोंबी घेते माझ्या कवितेत जेव्हा फुंकीन मी प्राण नवा तेव्हा तुम्हा रसिकांचा पाठीवरी हात हवा
काव्यरस

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

शून्य....

लेखक ओ यांनी गुरुवार, 16/03/2017 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे विखुरलेले ब्रम्हांड सारे आज विलीन होउदे आज पुन्हा अंधाराला शून्य होऊन राहूदे
काव्यरस

उत्तुंगतेचा प्रवास ||१||

लेखक ओ यांनी गुरुवार, 16/03/2017 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघे बद्रीनाथ हुन चोपता कडे जायला निघालो,चोपता बद्दल वाचून होतो की तीथे वीज नाही, बद्रीनाथ ते चोपता हा प्रवास तर आमच्या डोळ्यांसाठी एक पर्वणीच होती शुष्क हिमालयाच्या रंगानं पासून गर्द दाट हिमालयाच्या झाडीतला तो प्रवास,आज ही त्याचा गारवा अंगावर जाणवतो,आमची गाडी त्या पर्वत रंगानं मधून जात होती आणि आम्ही निसर्गाच्या एक अद्भुत रचनेचा प्रवास करत होतो ती जंगल जणू काही आम्हाला त्यांच्या कुशीत विसावा घेण्यासाठी आमंत्रण देत होती, आमचा प्रवास आता चोपता पाशी येऊन थांबला,आणि तेव्हा कळलं की दुपार चे अडीच झाले आहेत फारशी भूक नव्हती पण तरी आम्ही जेवलो,आम्हाला वाटलं होतं की चोपता हे छोटेखानी गाव

नेत्याच्या सोयीचं राजकारण

लेखक परशु सोंडगे यांनी गुरुवार, 16/03/2017 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ****************************** नेत्यांच्या सोयीचं राजकारण ************* आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी... तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं. तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती.

खिडकी पलीकडचं जग भाग 2

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 15/03/2017 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग २ खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. अड्जस्टेबल होता तो. गौरीच्या सोयीप्रमाणे ती तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या बेड जवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जावायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली. "बेटा... मी माझी बदली करून घेतली आहे. आपण नाशिकला जातो आहोत." बाबांनी गौरीच्या मूडचा अंदाज घेत तिला सांगितले.

||कोहम्|| भाग 1

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 15/03/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा.. वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं.. या महास्फोटानंतर साधारण 3 लाख वर्षांनी, पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात अभिसरण सुरु झालं, या दोन घटकांनी एकमेकांना एका आकृतिबंधात बांधलं, ज्याला आपण ऍटम किंवा अणू म्हणतो. या अणूनी स्वतःला पुन्हा काही विशिष्ट प्रकारे रचून घेतलं, ज्याला आपण आज रेणू म्हणतो.

सांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/03/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. (यात अनधिकृत पाकव्याप्त प्रदेश 78,114 चौरस किमी, पाकिस्तानने अनधिकृतपणे चीनला सोपवलेला 5,180 चौरस किमीचा प्रदेश आणि चीनकडे असलेला 37,555 चौरस किमी या अनधिकृत ताबा प्रदेशांचा समावेश आहे.) राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे. राज्याच्या प्रमुख भाषा उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोंगरी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी व दादरी या आहेत.

एका बोक्याची गोष्ट - भाग ३

लेखक निलम बुचडे यांनी बुधवार, 15/03/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग ३ * विशेष सूचना - ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. * वाचकांच्या प्रतिक्रियेतून एक सूचना मिळाली की 'आमच्या बोक्याला काय वाटतं' ते लिहा. या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!! कारण मी हे विसरुनच गेले होते की त्याला काय वाटतं हे देखील आमच्या कुटुंबातील माणसांना समजतं. हिवाळ्यातला एक किस्सा सांगते. थंडीच्या दिवसांत सकाळी आम्ही सगळे कुटुंबिय आणि आमचा बोका आमच्या अंगणात उन्हाला बसलो होतो. थोड्या वेळाने आमचा बोका पप्पांकडे बघून म्याव म्याव करायला लागला. खरंतर त्याला भूक लागल्यास तो कधीही म्याव म्याव करत नाही.

कोहोज किल्ला.

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 15/03/2017 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्र गडावरून आल्यापासून सगळे बोंबलत होते... पुढची ट्रीप कुठे(होय, गृपात सगळे ट्रीप ट्रीप करत असतात आणि मी त्यांना ट्रेक ला नेतो नेहमी) ते ठरवा. मग मी मुरुड जंजिर्याचा प्लान केला. एकाच दिवसाचा. वेळापत्रक थोडं घाईच होतं पण सगळे आनंदाने तयार झाले. पण अचानक मध्ये विघ्न आलं आणि मी स्वत:च हि ट्रीप रद्द केली. आता पुन्हा हि सगळी तोंडं बंद करणं गरजेचं होतं. कुठे जायचं हे डोक्यात येत नव्हतं. अचानक एक किल्ला आठवला...अगदी जवळचा पण दुर्लक्षित...