नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
काय, फराळ केलात? आता चार-आठ दिवस रोज फराळाचं खाऊन कंटाळलात की मग जोडीला काहितरी खमंग करून खा. त्यासाठीच देतेय हराभरा कबाब पाककृती.
साहित्य : पालक : १ मध्यम जुडी
बटाटे : २
मटार : १ वाटी
भाजलेलं बेसन : २ चमचे
मीठ : चवीनुसार
गरम मसाला : एक छोटा चमचा
आलं-लसूण पेस्ट : १ चमचा
पुदिना : मुठभर
कोथिंबीर : छोटी वाटी
हिरव्या मिरच्या : ३-४
चाट मसाला : १ चमचा
काजू : सजावटीसाठी
कृती : पालक पानं स्वच्छ निवडून, धुऊन घ्या. उकळत्या पाण्यात ५-७ मिनिटं उकळून बाजूला काढा. आता यातील जास्तीत जास्त पाणी काढून टाका. हवं तर कढईत थोडं परतून कोरडं करून घ्या.
कढईत चमचाभर तेल तापवा. त्यात गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मिरची, पुदिना, कोथिंबिर टाका. जरा परतून घ्या.
त्यात पालक, मटार घालून जरा कोरडं होईपर्यंत परता. गार होऊ द्या. मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्या. त्या मिश्रणात बटाटा कुस्करून घाला. भाजलेलं बेसन गरजेपमाणे घाला.
आता या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या. त्यावर एक एक काजू पाकळी लावा आणि तव्यावर थोड्या तेलावर भाजून घ्या.
कबाब तयार आहेत! पुदिना चटणी, टॉमेटो केचपबरोबर खा.
आता या मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या. त्यावर एक एक काजू पाकळी लावा आणि तव्यावर थोड्या तेलावर भाजून घ्या.
वाचने
19913
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! एकदम चटपटीत.
सुरेख
कालच कबाबची आठवण आली होती आणि
मस्त पाककृती , सुंदर
एकच नंबर !!!
मस्त रेसेपी
एकदम मस्त....
वा वा, घरात सगळं आहे, करुन अ
मस्त
अगदी ...
In reply to मस्त by स्वाती दिनेश
वाह! मस्तच.
सुपर्ब!
तोंपासु!
तोंपासु!
मस्त!
आवडेश
तोंपासु पाककृती
झक्कास!
हा माझा आवडीचा पदार्थ आहे.
अहा!
फोटो आणि कृती आवडली.पटकन
यम्मी !
वॉव !!
आवाडलं हो आवाडलं. जंक्शान
वा वा वा! आवडले एकदम! फराळ
हराभरा कबाबमधे हरभरे का नसतात
मग त्याला हरभरे कबाब म्हणावे
Jabarach