Skip to main content

अॅपल केक

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 29/10/2016 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅपल केक प्रकार २ अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल. साहित्य : १०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध, २ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर ४-५ मध्यम आकाराची सफरचंदे कृती : बटर भरपूर फेटणे, मिक्सी फिरवताना हाताला हलके लागायला लागेल. मग त्यात साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे. चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालणे आणि फेटणे. मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे. सफरचंदाच्या साली न काढता अगदी पातळ फोडी करणे. ज्या भांड्यात केक करायचा असेल, त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे. त्यावर सफरचंदाच्या फोडी बसवणे. ओव्हन प्री-हीट करणे. १८० अंश से.वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे. आवश्यकता वाटली, तर अर्ध्या तासानंतर तापमान १७० अंशावर आणणे. फोडी पातळ आहेत त्या जळत नाहीत ना, ह्याकडे लक्ष देणे. बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभित करणे. कॉफी आणि व्हिप्ड क्रीमबरोबर खाणे. . .

वाचने 13372
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

किती सुरेख दिसतोय गं... मस्त

अरे... कोणी तरी हा केक माझ्या पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करा रे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

In reply to by सूड

तू ब्राउझर कोणता वापरतो आहेस? मलाही पूर्वाविवेकचे मूगाच्या लाडूचे फोटो मोझिला मध्ये दिसले नाहीत पण गुगल क्रोममध्ये दिसले. एकदा ब्राउझर चेंज करून बघ ना प्लिज जरा.. स्वाती

मी फेसबूक पाहिला होता पण बेकिंगचे पदार्थ अजून केले जात नाहीत. जमेल का असे वाटते