मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जखमात यौवनाच्या

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे असती कुणी विलासी कोणी उदासवाणे असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे ती आग अंतरीची जाळी कणाकणाने ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने होती अबोल का हो? ना बोलती कशाने हळुवार त्या स्मृतींना कि त्यागती अशाने? मजनू इथे फिरस्ते तुडवित माळराने आयुष्य कंठती अन् घायाळ काळजाने जखमात यौवनाच्या होती कुणी शहाणे बदलुन पायवाटा तरती अनुभवाने सुरुवात जीवनाची करती कुणी नव्याने उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने - शार्दुल हातोळकर

वाचने 3142 वाचनखूण प्रतिक्रिया 19

पैसा 19/01/2017 - 23:07
सुरेख कविता!

नीलमोहर 20/01/2017 - 10:45
' उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने ' सकारात्मक शेवट आवडला,

किरण कुमार 20/01/2017 - 13:27
शब्द आवडले , सूरेख

गौरी कुलकर्णी २३ 20/01/2017 - 17:29
छान काव्यरचना ! काळजाला भिडली... शेवटच्या चार ओळी सकारात्मक विचारसरणी मांडतात !!

शार्दुल_हातोळकर 20/01/2017 - 22:40
एस, कुलकर्णी सर, आत्मबंध, पैसाताई, खग्या, नीलमोहर, किरण, गौरी, जव्हेरगंज भाऊ, सर्वांना मनापासुन धन्यवाद!! __/\__

शार्दुल_हातोळकर 21/01/2017 - 21:09
धन्यवाद ज्योती अलवनि आणि रातराणी !

समाधान राऊत 23/01/2017 - 14:51
ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे

देशप्रेमी 24/01/2017 - 14:26
खुप सुंदर काव्यरचना!! सकारात्मक शेवट खुप उत्तम झाला आहे. एका प्रतिभावंत कवीची झलक दिसत आहे!!