Skip to main content

अनवट किल्ले १९:वारणेचे वाघ, बहादुरवाडी( Bahadurwadi ) , विलासगड, मल्लिकार्जुन( Vilasgad, Mallikarjun )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/09/2017 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी, हिच सीमा मानुन मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले. याच वारणेच्या खोर्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या वाघाच्या काळजाचा माणुस जन्मला. याच परिसरात एक प्राचीन गड विलासगड किंवा मल्लिकार्जुन व मराठाकालीन भुईकोट बहादुरवाडी वसलेले आहेत. या धाग्यात त्यांचीच माहिती घ्यायची आहे. बहादुरवाडी या भुईकोटासंदर्भात दोन कथा वाचायला मिळतात. आधी त्या पाहु आणि मग भुईकोटाची सैर करु पहिली कथा अशी आहे कि, सुमारे ३५० वर्षापुर्वी आदिलशाहीचा ४०००० सुवर्णहोनांचा खजिना विजापुरकडे चालला होता.

Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ

लेखक गम्मत-जम्मत यांनी गुरुवार, 21/09/2017 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली. (मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!!

जगण्यासाठी पुरेसे

लेखक RDK यांनी गुरुवार, 21/09/2017 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या घड

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 21/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥

नभ उतरु आल तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन.

कर्करोगाचा विळखा

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/09/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला. २०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे.

खिडकी

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/09/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.

राजांचे मावळे - १

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 21/09/2017 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
घोडखिंड : खाशाबा खाशाबाला वाटायला लागलं की छातीचा भाता आता फुटतो की काय, त्याला आठवतच नव्हतं की पळायला सुरुवात करून किती तास झाले होते ते. चन्द्र काही कामाचा नव्हता कारण पावसाने धिंगाणा चालवला होता. हातातले पलिते विझत होते ते परत पेटवायला लागत होते. भाला पकडून पकडून हाताची बोट सरळ व्हायची विसरली होती, ढालेने पाठ धरली होती नि तलवार कमरेला खुपत होती. हा सगळा विचार मनात चालू असतानाच बाजींनी थांबण्याचा संकेत दिला. राजांच्या पालखीचे भोई दमले होते.