Skip to main content

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/09/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो. पहिला प्रकल्प आहे तो तैवान बुलेट ट्रेनचा. तैवान हा एक छोटासा देश आहे. श्रीलंकेच्या बेटाची रुंदी जर कमी केली तर ते बेट जसं दिसेल साधारणपणे तसाच तैवानचा आकार आहे.

बार, कॉलेज गॅदरिंग आणि काळी पिवळीमध्ये वाजणाऱ्या गाण्यांचा बादशहा

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 27/09/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकारांची एक बिरादरी असते. सर्वसामान्य जनतेमध्ये ते किंवा पडद्यामागे काम करणारे असतील, तर त्यांचं काम तुफान म्हणावं इतकं लोकप्रिय असतं. पैसा आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असते. पण समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग या कलाकारांचं कुणी नाव घेतलं तरी नाक मुरडतो. समीर अंजान उर्फ शीतला पांडे हा असाच एक पडद्यामागचा कलाकार आहे. गीतकार या जमातीला अगोदरच आपल्याकडे प्रसिद्धी मिळत नाही. त्यातच 'मासेस'साठी काम करणाऱ्या कलाकारांवर तर अनेकदा वेगवेगळे ठप्पे मारून त्यांना अदखलपात्र ठरवण्याचं उद्योग नेहमीच चालू असतात. मागे एक किस्सा वाचनात आला होता.

आरसा

लेखक प्रावि यांनी बुधवार, 27/09/2017 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ? कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ? कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय ..... अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय.... देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे , अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे .... दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस , अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस .....

हरिहरि...

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाचे वजन झाले मासातोळे कण्याचेही आता करतो वेटोळे व्हायचा गजर उंचावता हात कुठे गेली आता सगळ्यांची साथ केव्हाच फेकला भिकेचा कटोरा उरलासे आता फुकाचाच तोरा वाट जरा थोडी पाहिलेली बरी नाहीतर आता करू हरी हरी

नितीन बनतो डॉक्टर

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 26/09/2017 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
नितीन बनतो डॉक्टर ----- ( या काल्पनीक लेखातील घटनाकाळ हा १९८५च्या आसपासचा धरला आहे . ) आंबेवाडीतल्या आपल्या रुममधे आज सकाळी संजु , सोनाची दुक्कल टपकलेली पाहुन नितीन थोडा चकीतच झाला . या दोघांचेही चेहरे त्याला जरा उदासवाणे वाटले . पण लगेच स्व:ताला सावरुन त्याने हसत या बच्चे कंपनीचे स्वागत केले . "अरे वा . अलभ्य लाभ . आज सकाळीच शेरलॉक होम्स आणी वॅटसन यांची जोडगोळी या पामराकडे कशी काय उगवली ? " "आम्ही आलो आमच्या सर आर्थर कॉनन डाईलला भेटायला " संजुनेही त्याला किंचीत हसत टोला मारला . त्या तिघांनीही एकमेकांना पाडलेली ही टोपण नावे होती .

मन

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन मायेचा वारसा मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...