Skip to main content

कुलुप

लेखक RDK यांनी मंगळवार, 19/09/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती. स्टेशन गेट जवळ उसाच्या रसाचे दूकान लोकांचा गळा थंड करत होते. शाळेतुन येणारी काही मुले बंगल्यांच्या बाहेर, झाडावरुन पडलेले बादाम दगड़ाने फोडुन खात होती. तेवढ्यात एक गाडी गेटजवळ येऊन थांबली. मालगाड़ी जात होती. स्टेशन गेट लावलेले होते.

का पुन्हा???

लेखक RDK यांनी मंगळवार, 19/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती अनोळखी भावना कागदावर उतरत नाहीये हा मनातला गुंता सूटता सूटत नाहीये प्रश्न राहिले आहेत अनुत्तरित माझे पण तो अस्पष्ट चेहरा पुसला जात नाहिये शांत हृदयाचे तार छेडले गेले की भरलेल्या जख्मा उघड्या पडल्या प्रेमाचे का हे सुर जे हृदयी वाजतात का वेदना पुन्हा माघारी वळल्या परिवर्तन अनिवार्य आहे परंतु क्षणभंगुर कसे काय होते कोरडे दुष्काळी हृदय माझे भरूनी लगेच रीते कसे होते का वाटा पुन्हा पाउलाखाली याव्या जिथे मी एकटाच घुटमळत उभा का मग असावी जाणाऱ्याला सोडूनी पुन्हा परतन्याची मुभा .....…........................RDK

आज पुन्हा

लेखक RDK यांनी मंगळवार, 19/09/2017 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा आज पुन्हा जगाच्या पायाशी पडलो आणि दुःखाभोवती लोटांगण घातले कोरडे ठणठणीत पडलेले डोळे पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले त्या उगवत्या प्रेमाचे किरण दुःखाची झोप मोडणारच होते पण भ्रमनिरासेच्या थंडीत कडक मन माझे पुन्हा घोरत पडले होते या मोठेपणाच्या गदारोळात खोट्या माझ्यातले बालक पुन्हा रुसले कोरडे ठणठणीत पडलेले डोळे पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले जीवन माझी धर्मशाळा येथे पांथस्थ येतात आणि जातात कुणी आठवणींची देणगी देतं तर कुणी भिंतींवर ओरखडे पाडतात कमकुवत झालेल्या भिंतींमुळे दुःखाचे छप्पर पुन्हा कोसळले कोरडे ठणठणीत पडलेले डोळे पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले तो लोपलेला आत्मसन्मानाचा सूर्य ज

वेबसाईट तयार करण्याबद्दल

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 19/09/2017 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
वेबसाईट तयार करण्याबद्दल माहिती हवी आहे मी नुकताच एक व्यवसाय सुरु केला असून माझे प्रॉडक्ट मला पुण्यामध्ये ऑनलाईन विकायचे आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्याचा प्लॅन आहे. वेबसाईटवरच पेमेंट करण्याची सुविधा त्यावर असेल. एकदा ऑर्डर आली कि मग प्रॉडक्ट घरपोच मिळेल असं काहीसे प्लँनिंग आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन सारख्या पोर्टल वर देखील अशीच सुविधा असते परंतु मला स्वतःचे Aaplication तयार करायचे आहे. मला HTML आणि वेब डिझाईन चे ज्ञान आहे पण कोणताही व्यवसायिक अनुभव नाहीये त्यामुळे एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून हे काम करून घ्यायचे आहे. कोणी मिपाकर वेब डिझायनिंग आणि वेब होस्टिंग मध्ये मदत करू शकेल का ?

रमलखुणांची भाषा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 19/09/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....
काव्यरस

गवळीच्या चरणी कलात्मकता

लेखक डॅडीभाई यांनी मंगळवार, 19/09/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
बेरोजगार असताना फुकटचा पैसा मिळविण्याची चटक लागली की पावलं गुन्हेगारीकडे वळू लागतात. अरुण गवळी त्याला अपवाद नाहीच. ज्या काळात मुंबई हाजी मस्तान आणि करीम लाला या तस्करांच्या नावाने ओळखली जायची, त्या दशकात म्हणजेच सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मुंबईत एक वेगळं गुन्हेगारी विश्व उभं राहात होतं. त्याला हळूहळू रक्ताची चटक लागत होती. स्मगलिंग पुरतं मर्यादित हे गुन्हेगारी विश्व विस्तारु लागलं आणि वर्चस्वासाठी लढाया सुरु झाल्या. त्या लढायांचं नाव होतं गँगवॉर. करीम लाला आणि हाजी मस्ताननंतर मुंबईचा डॉन कोण, तर दाऊद अशी स्थिती होती. या जगतावर त्याची पकड बसू लागली होती.

निरीक्षकाची स्थिती – गती चौकट आणि सहनिर्देशक पद्धती (Frame of reference and coordinate system)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 19/09/2017 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
राजा विक्रम आजही चिंतित होता. वेताळाला एवढी उत्तरे देऊन, एवढे तर्क लढवून तो शेवटी असा काही प्रश्न विचारतो आणि निसटतो. हे जसजसं खोल गहन होत होतं तसं ते अधिक गूढरम्यही वाटत होतं. खरोखरीच रोजच्या जगण्यातल्या किती गोष्टींना ही भुतं लपेटून असतात, किती ठिकाणी केवळ तर्क आणि निरीक्षण नसल्याने अंदाज बांधणं अवघड जातं, पण वस्तुनिष्ठ पणे सोप्यासोप्या गोष्टींच्या उकलीतून मग अधिक गहन गुंत्याकडे कसं जाता येतं याचा वस्तुपाठच जणू तो गिरवत होता. वेताळ हा एखाद्या पिशाच्चापणे आक्रस्ताळा न होता हुशार शिक्षकाप्रमाणे विचार करायलाही लावत होता आणि फिरकीही घेत होता.

ह्रदयातुनी

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी सोमवार, 18/09/2017 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
धावत्या पायास माझ्या लाभु दे आता विसावा भाबड्या माझ्या मनाला श्रावणाचा साज यावा अंतरी आहेत ज्याही वेदना जाव्या विरुनी लाभुनी हळुवार माया घावही यावे भरुनी शोधतो आहे निवारा त्या रुपेरी काळजाचा वाटते यावा जरासा गारवा आता सुखाचा अंतरी वाहे झरा जो माझिया ह्रदयामधुनी अमृताचा गंध त्याला ओंजळीने घे भरुनी उगवु दे सूर्यास पुन्हा जाळुनी अंधार सारा संपण्या आता उन्हाळा बरसु दे श्रावणधारा सोसुनी चटके हजारो वाट मी चाले कधीचा शमविण्या ये तू खरोखर दाह माझ्या अंतरीचा - शार्दुल हातोळकर
काव्यरस

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.