Skip to main content

संघर्ष : भाग ०५ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 30/09/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०४ पासून पुढे.. काही वेळानंतर.. (वेळ : संध्याकाळी ६ वा. स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.) सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती. सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं.

तिन्ही सांजा.....

लेखक रुस्तुम यांनी शुक्रवार, 29/09/2017 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो. त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय. 'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी.

परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 29/09/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज. मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते. त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला. रेल्वेचा हा गलथानपणा आहेच.

उदय कॉर्लिग्झम्सचा भाग ३

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 29/09/2017 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 (http://www.misalpav.com/node/40857) भाग 2 (http://www.misalpav.com/node/40953) आॉस्टिनामधली गुप्त बैठक संपवुन मायकल कॉर्लिगला परतला. नव्या धर्माची घोषणा करण्याआधीची संपुर्ण वातावरण निर्मीती झाली होती. ब-याच लोकांच्या मनात आपण कॉर्लिगचे पुरते तारणहार बनलो आहोत हे मायकलने चाचपुन पाहिले होते. मायकलला भेटणा-या लोकांचा अोघ वाढतच जात होता. व्यवसायिकांशिवाय सामान्य लोक येऊन आता मायकलला काहीतरी करण्यासाठी गळ घालत होते. एकंदरित मायकलच्या मनासारखे घडून येत होते.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल मोहीम....२० वर्षांपूर्वी

लेखक सावत्या यांनी शुक्रवार, 29/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो. साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल मोहीम....२० वर्षांपूर्वी

लेखक सावत्या यांनी शुक्रवार, 29/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो. साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती.

पावसाळी भटकंती: दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 29/09/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्नर तालुका म्हणजे प्रचंड टोलेजंग शिखरांचे भरलेले संमेलनच जणु. यात काही दुर्ग आहेत, पर्वतांचे पोट पोखरून तयार केलेली काही लेणी आहेत.नाणेघाटासारखे प्राचीन घाटमार्ग आहेत, कुकडेश्वरासारखी जागती देवालये आहेत, तर कड्याकपार्‍यात वसलेले लेण्याद्री पर्वतात वसलेले अष्टविनायकापैकी एकमेव स्थान आहे.

अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच

लेखक ट्रेड मार्क यांनी शुक्रवार, 29/09/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये. पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले.