Skip to main content

काहीतरी नक्कीच आहे....

लेखक सतिश पाटील यांनी मंगळवार, 03/10/2017 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेखात शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत. ओफिसमधे वेळ काढून हे सर्व लिहिलय. जमल्यास शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. 'कोणीतरी आहे तिथं!' हा धागा अणि त्यात दिलेले दुवे वाचले अणि माझ्यासोबत घडलेले प्रसंग डोळ्यासमोरून गेले. भुत हा विषय असा आहे की त्यावर विश्वास ठेवावा किंवा ठेवू नए हे ज्याने त्याने ठरवावे. पण काही प्रसंग काही व्यक्तींच्या आयुष्यात असे घडतात, की ते समजणे खुप कठीन आहे. अणि हे सर्वच लोकांसोबत घडतच असे नाहीं.

आज ब्ल्यू हैं पानी पानी...

लेखक सरनौबत यांनी मंगळवार, 03/10/2017 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज ब्ल्यू हैं पानी पानी परवा कपाटाची आवरा-आवर करताना माझा आवडता Arrow चा पांढरा शर्ट दिसला. पांढरा शर्ट घालणे म्हणजे माझ्यासाठी 'पांढरा हत्ती' पोसण्याइतके अवघड काम आहे. पांढराशुभ्र शर्ट मी माझ्या अब्रु इतका जपतो. सर्फ एक्सेल कंपनीसाठी भले 'दाग अच्छे' असतील, पण पांढऱ्या शर्टसाठी अजिबात नाही. छोटासा डाग देखील पांढऱ्या रंगावर ठळकपणे दिसतो. म्हणून चुकूनही डाग पडू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. कधीनव्हे तो पांढरा शर्ट घालावा आणि नेमकी त्याच दिवशी घरी आवडती उडदाची आमटी असते. आमटीचे मनसोक्त भुरके मारताना शर्टवर एखादा शिंतोडा उडण्याची भीती.

शेअरबाजारः येतील जातील परीट रगड, धुण्याचा दगड तोच आहे -गदिमा

लेखक प्रसाद भागवत यांनी मंगळवार, 03/10/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
99/00 म्हणजे Y2Kच्या जमान्यातली गोष्ट आहे.. HCL Tech चा पब्लिक ईश्शु तुफान हिट झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक IPO वर गुंतवणुकदारांच्या उड्या पडु लागल्या, Oversubscription चे प्रमाण खुप वाढु लागले. अर्ज केल्यावर शेअर्स मिळणे दुरापास्त झाले. IPO मार्गे स्वस्तात मिळालेले शेअर्स् विकुन नफा हा सर्वात सोपा मार्ग, आणि दुसरीकडे जोराची आर्थिक निकड यामुळे सुरवातीला प्रत्येक IPOला अर्ज केल्यावर आम्ही मित्र लगेचच मुंगेरीलाल, शेखचिल्ली अशा भुमिका करायला सुरवात करीत असु, होणाऱ्या फायद्याची विल्हेवाट कशी लावायची याचेही आमचे प्लॅन्स तयार असत... ते अगदी पार रिफंड ऑर्डर यईपर्यंत.

वासफुलं

लेखक Swapnaa यांनी मंगळवार, 03/10/2017 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
वासफुलं काळोख्या अंधारांत अचंबनेच्या वळणात, वेदनांच्या आवाजांत जळणाऱ्या दिव्यांत, कळ्यांच्या बाजारांत पैश्यांच्या व्यापारांत, शृंगाराच्या पसाऱ्यात वासनेंच्या डोळ्यांत, विकृतीच्या प्रहारांत अश्रुंच्या पुर्णविरामात...... कवी - स्वप्ना
काव्यरस

फसलेल्या उपवासाची कहाणी

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 02/10/2017 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते.

मौसुत उंडा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 02/10/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
पोळ्या मौसुत व पदर सुटलेल्या हव्या असल्यास कणीक चांगली मळावी लागते..व ते काम नाहि तरी कष्टाचेच असते किलो भर कणीक ५/७ मीनीटात उत्तम पणे मऊ कशी मळावी याचे एक टेकनिक नेट वर टंगळमंगळ करताना सापडले.. एक किलो वा हव्या वजनाचे कणकीचे पीठ घ्या तेल मीठ पाणी टाकून मळा उंड्याला बोटाने चित्रात दाखवल्या प्रमाणे भोके पाडा व कणीक किती घट्ट भिजवली आहे याचा अंदाज घेत भोकावर पाणी शिंपडा मी चमच्या ने २-३ थेंब पाणी प्रत्येक भोकात टाकतो उंडा पलटा व दुस-या बाजुला बोटा नी भोके पाडुन थेंब २-३ थेंब पाणी टाका.. उंडा ५-६ मिनिटे झाकून ठेवा नंतर बाहेर काढा व २-३ मिनिटे मळा.. मौसुत उंडा तयार...

मला आलेला अनुभव -२

लेखक ओरायन यांनी सोमवार, 02/10/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला अनुभव -२ ह्यात मी छोटे छोटे दोन अनुभव एकत्र केले आहेत. कारण प्रत्येकासाठी ऐक ऐक वेगळा धागा काढणे शक्य नाही व ते व्यवहार्यदेखील नाही. आपण कधी पूर्णपणे आपल्यावरील ताबा गमावला आहे का ? म्हणजे कधी पूर्णपणे वेळेस्वाधीन झाला आहेत का ? ' वेळ आली पण काळ आला नाही' या उक्तीचा तुम्हाला अनुभव आला आहे का ? मला दोन वेळेस आला आहे. १. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. माझी 'पोहायला शिकण्याची' तयारी चालू झाली होती. तसे बघायला गेलो तर हे पोहायला शिकण्याचे वय उशीराच झाले. मात्र त्याचा एक फायदा (कि 'तोटा' ?) म्हणजे आई वडिलांचे आपल्यावर वाढलेला विश्वास. काळजी करण्याचे प्रमाण कमी.

नाशिककर मिपाकर

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 02/10/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा आयोजित करावासा वाटतो आहे. तेव्हढ्याच भेटी-गाठी होतील. नाशिककरांचे काय मत आहे?

कट्ट्याची जागा व वेळ :

रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)

तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.

(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/10/2017 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...