Skip to main content

शिवकाल-निर्णय

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिवकाल-निर्णय दिनांक १० नोव्हेंबर, २०१७. आज अफ़जलखानाच्या वधाला ३५८ वर्षे पूर्ण झाली. सहज म्हणून 'कालनिर्णय' पाहिलं तर ह्या दिवशी 'कालभैरव जयंती' असल्याचं समजलं. ह्या 'कालभैरव जयंती' खेरीज अफजलखान नावाच्या ‘काळभैरवाची पुण्यतिथी' देखील नमूद करायला हवी होती असं वाटलं. 'कालभैरव जयंती' शिवाय 'पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी' देखील कालनिर्णय मध्ये ह्याच दिवशी लिहिली आहे. गावो-गावच्या लहान-मोठ्या महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणवार इतपत मर्यादित माहिती आपल्या कॅलेंडर्स मध्ये असते.

हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?

लेखक साहना यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते. NCMEI हि एक घटनात्मक संस्था असून देशांत कुणाला अल्पसंख्यांक दर्जा असावा हे ठरवण्याचे अधिकार ह्या संस्थेकडे आहेत. कायद्या प्रमाणे कुणीही हिंदू ह्या संस्थेचा पदाधिकारी असू शकत नाही.

मदत हवी आहे -किल्ले रायगडावर मुक्काम

लेखक सतिश पाटील यांनी शुक्रवार, 10/11/2017 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
२९ किंवा ३० डिसेम्बर रोजी किल्ले रायगडावर एक छोटी सहल करण्याचा इरादा आहे. आम्ही एकून ८ मोठी जण असून एक लहान मुलगा आहे. या आधी घाई गडबडित एकदा हा किल्ला पहिला आहे, पण समाधान झाले नाही. हेतु हाच आहे की, स्वराज्याची राजधानी आणि इतिहास अनुभवता येइल, थोड थ्रिल म्हणून रोपवेत बसता येइल. यापूर्वी कधीही किल्ल्यावर वस्ती केली नाहीये, त्यामुळ तो ही अनुभव घ्याचय. अगदी सकाळी उजडताना तो किल्ला आणि आजुबाजुचे सौन्दर्य पहायचे आहे. शोधाशोध केली असता, रायगडावर MTDC च रिसोर्टवजा होटल आणि रोपवेवाल्यांचे एक छोटे होटल असल्याचे समजले. MTDC च्या बुकिंग वेब्साईट वर रायगड किल्ल्याच्या निवासचा कुठलाही उल्लेख नाही.

पदार्थधर्मसंग्रह: ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 10/11/2017 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: मागे एका लेखात २ऱ्या शतकातल्या ज्या प्रशस्तपादभाष्य/पदार्थधर्मसंग्रह पुस्तकाचं वर्णन केलं होतं त्याच्या पहिल्या धड्यातील संस्कृत श्लोक, १९१७ सालचं आता कुठंही न मिळणारं इंग्रजी भाषांतर व त्यावर आधारलेला मराठी भावानुवाद देताना अतिशय छान वाटतंय..नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.कोण्या अधिकारी/शास्त्रज्ञ माणसाने विषयाला अधिक न्याय जरूरच दिला असता अशी जाणीव मनात ठेवून पहिल्या धड्याचं भाषांतर खाली देत आहे..) ग्रंथारंभ पदार्थधर्मसंग्रह ग्रंथाची सुरुवात प्रशस्तपादऋषी खालील प्रमाणे करतात: प्रणम्य हेतुमीश्वरं मुनिं कणादम

काळाची उबळ

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 10/11/2017 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

शिवमानसपूजा

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/11/2017 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
शिवमानसपूजा आपण घरी देवाची पूजा करतो तेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे देवाला अंघोळ घालतो, गंध लावतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो, घंटा वाजवतो एखाद दुसरे स्तोत्र म्हणतो. व हे सर्व आपल्या सोयिस्कर वेळेनुसार.करतो. खरी पंचाईत होते जेव्हा आपण सहली निमित्त बाहेरगावी जातो व एखाद्या देवळात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा. तेथे ह्यापैकी काहीच शक्य नसते. अशा वेळी काय करावे ? आद्य शंकराचार्यांनी तुमची सोय करून ठेवली आहे. मानसपूजा. ईश्वराला बाह्योपचाराची अपेक्षा नाही. हे सर्व तुम्ही केवळ मनातल्या मनातही करू शकता. क्से ? बघा.